Ketaki Chitale : 'हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी,' अभिनेत्री केतकी चितळेची पंतप्रधान मोदींकडे मागणी
Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
Ketaki Chitale : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर अनेकांनी पंतप्रधान मोदींसाठी अभिनंदनाच्या पोस्ट लिहिल्या आहेत. पण यामध्ये अभिनेत्री केतकी चितळेची (Ketaki Chitale) पोस्ट सध्या बरीच चर्चेत आली आहे. पंतप्रधान मोदींचा शपथविधी झाल्यानंतर केतकीने ही पोस्ट केली आहे. तसेच काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरही केतकीने भाष्य केलं आहे.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे केतकी कायमच चर्चेत असते. तसेच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तिला तुरुंगात देखील जावं लागलं आहे. पण तरीही ती तिची स्पष्ट मतं सोशल मीडियावर कायमच मांडत असते. सध्या केतकीने केलेली पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आलीये.
पंतप्रधानांसाठी केतकीची पोस्ट
अभिनेत्री केतकी चितळे हिने पंतप्रधानांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यावर तिने 'हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी' असं कॅप्शन लिहिलं आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी आक्षेपार्ह कमेंट्स देखील केलेल्या आहेत. त्यामुळे केतकीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली आहे.
View this post on Instagram
काश्मीरमधील हल्ल्यावर केतकीची पोस्ट
केतकीने काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरही पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने म्हटलं की, 'काल वैष्णव देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांच्या गाडीवर हल्ला झाला. कुठे आहे ऑल आईज ऑन रफाह वाले लोक? हिंदू राष्ट्राची आमची मागणी पूर्ण करा. '
एनडीए सरकारने बहुमत मिळवत तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता मिळवली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जून 2024 रोजी तिसऱ्यांदा राष्ट्रपती भवन येथे देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला जगभरातल्या मान्यवरांनी उपस्थिती लावली. तसेच अनेकांनी त्यानंतर पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा देखील दिल्या. पण त्याचवेळी काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यावरुन विरोधकांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. त्यावर आता केतकीची पोस्टही चर्चेत आली आहे.
ही बातमी वाचा :