Katrina Kaif Vicky Kaushal Blessed With Baby Boy: विक्की कौशलच्या घरी आला चिमुकला पाहुणा; 42व्या वर्षी आई झाली कतरिना, बाळाचं नाव काय ठेवलं?
Katrina Kaif Vicky Kaushal Blessed With Baby Boy: वयाच्या 42व्या वर्षी कतरिना कैफनं बाळाला जन्म दिला आहे. विक्की कौशलनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन गूड न्यूज शेअर केली आहे.

Katrina Kaif Vicky Kaushal Blessed With Baby Boy: बॉलिवूडचं (Bollywood News) स्टार कपल विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या घरी गोड गोडुल्या चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालंय. जोडप्यानं आपल्या बाळाचं स्वागत केलंय. वयाच्या 42व्या वर्षी कतरिना कैफनं मुलाला जन्म दिला आहे. विक्की कौशलनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन गूड न्यूज शेअर केली आहे.
विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आमच्या आयुष्यात आनंदी आनंद आलाय, असं पोस्टमध्ये म्हटलंय. विक्की-कतरिनाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय. दरम्यान, जेव्हा कतरिना-विक्कीनं प्रेग्नंसी अनाउंस केलेली, त्यावेळी चाहत्यांनी कमेंटमध्ये त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी वेगवेगळी नावं सुचवली होती. पण, विक्की कौशल, कतरिना कैफनं बाळाचं नाव जाहीर केलेलं नाही, त्यामुळे आता दोघे बाळाचं नाव काय ठेवणार? याची चाहत्यांना उत्सुकता लागलीय.
विक्की कौशलनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यानं लिहिलंय की, "आमच्या आनंदाचं आगमन झालंय... अपार प्रेम आणि कृतज्ञतेनं, आम्ही आमच्या मुलाचं स्वागत करतोय... 7 नोव्हेंबर 2025... कतरिना आणि विक्की..."
View this post on Instagram
कतरिना कैफच्या प्रेग्नंसीच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगलेल्या. अखेर काही दिवसांपूर्वी कतरिनानं आपली प्रेग्नंसी अनाउंस केलेली आणि त्यासोबत वेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा विक्कीसोबतचा एक फोटो शेअर केलेला. या जोडप्यानं सप्टेंबरमध्ये घोषणा केलेली की, ते त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत करणार आहेत.
विक्की-कतरिनाच्या पोस्टवर कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव
विक्की-कतरिनानं केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. केवळ चाहतेच नाही तर सिनेसृष्टीतील मित्रमंडळीही जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. मनीष पॉल यांनी लिहिलंय की, "तुमच्या बाळाच्या आगमनाबद्दल संपूर्ण कुटुंबाला आणि विशेषतः तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा..." तर, रकुल प्रीत सिंह देखील विक्की आणि कतरिनासाठी खूप आनंदी आहे. अर्जुन कपूर आणि हुमा कुरेशी यांनी रेड हार्ट इमोजी शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, चाहते विक्की आणि कतरिनाच्या बाळाच्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहत होते. प्रत्येकजण बाळावर प्रेमाचा वर्षाव करतोय. विक्की कौशल बाबा झाल्यामुळे खूपच खूश आहे. आता चाहत्यांना आपल्या लाडक्या जोडप्याच्या बाळाची पहिली झलक पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.























