Kareena Kapoor, Karisma Kapoor : करिश्मानं शेअर केला करिनासोबतचा खास फोटो; चेहऱ्याच्या रंगामुळे बेबो ट्रोल
करिश्मानं (Karisma Kapoor) तिच्या मालदीव वेकेशनचे फोटो शेअर केले. या फोटोमधील करिनाच्या (Kareena Kapoor) लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
Kareena Kapoor, Karisma Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) ही सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. करिश्मा ही बहिण करिना कपूर (kareena kapoor) सोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. करिश्मा आणि करिना काही दिवसांपूर्वी मालदीव येथे गेल्या होत्या. करिश्मानं तिच्या मालदीव वेकेशनचे फोटो शेअर केले. करिश्मानं शेअर केलेल्या तिच्या आणि करिनाच्या फोटोला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
करिश्मानं शेअर केलेल्या फोटोमधील करिनाच्या चेहऱ्याच्या रंगानं अनेकांचे लक्ष वेधले. या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'करिनाचा चेहरा एवढा लाल का झाला आहे?', तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'करिनाचा चेहरा हा लाल टोमॅटोसारखा दिसत आहे.' काही दिवसांपूर्वी करिना आणि करिश्माला त्यांच्या एअरपोर्टवरील नाइट सूटमधील लूकला देखील नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते.
View this post on Instagram
करिनाचा लाल सिंह चड्ढा हा आगामी चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये करिनासोबतच आमिर खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच करिना लवकरच ओटीटीवर देखील पदार्पण करणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मवर करिनाचा आगामी चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये करिनासोबतच पाताल लोक फेम अभिनेता जयदीप अहलावत (jaideep ahlawat) आणि विजय वर्मा (vijay varma) हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा :
- Sonam Kapoor Pregnancy: कुणी तरी येणार गं.... सोनम कपूर-आनंद आहुजाने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!
- RRR : राम चरण आणि ज्युनियर एनटीआरने आमिर खानला शिकवला डान्स, 'नाटू नाटू' गाण्याचा व्हिडीओ व्हायरल
- Viral Video : रात्री 12 वाजता नोएडाच्या रस्त्यावर धावत होता मुलगा, नेटकरी करतायत सलाम, कारण ऐकून व्हाल थक्क
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha