Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
Samay raina gets relief: समय रैनाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा.

Samay Raina gets major relief from Supreme Court: कॉमेडियन समय रैनाच्या (Samay Raina) संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) समय रैनाला दिलासा मिळाला आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट' (Indias Got Latent) या शोमध्ये दिव्यांग व्यक्तींबद्दल केलेल्या वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी त्याच्यासह इतर चौघांविरुद्ध दाखल केलेले सर्व एफआयआर सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. कोर्टाने हे आदेश तेव्हा दिले जेव्हा, याचिकाकर्ता एनजीओने असे कळवले की, कॉमेडियन त्यांच्या संपर्कात असून, एसएमए (स्पाइनल मस्कुलर एट्रॉफी) असलेल्या लोकांच्या कामगिरीला प्रोत्साहन देण्यास इच्छुक आहेत. एसएमए पीडितांना मदत देण्यासाठी सरकारला निर्देश देण्याकरिता या प्रकरणाची सुनावणी सुरु ठेवली जाईल, असे न्यायालयाने म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्टने सांगितलं की, समय रैना आणि इतर लोकांनी दिव्यांग लोकांसाठी जागरुकता कार्यक्रम चालवण्यासाठी आणि त्यासाठी लागणारे निधी एकत्र करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कोर्टाने सांगितलं की, जेव्हा प्रयत्न होते, तेव्हा त्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणामही दिसून येतात. तो एक चांगला व्यक्ती असून, जर त्याने योग्य दिशेनं काम करण्यास सुरुवात केली तर, त्याचे परिणाम नक्कीच सकारात्मक असतील, असंही त्यांनी म्हटलं.
View this post on Instagram
तसेच, अशा प्रकारच्या कंटेटवर अधिक चांगल्या प्रकारे कशी देखरेख करावी, त्यानुसार मार्गदर्शक तत्वे करावीत, यावर दिव्यांक व्यक्तींकडून सूचना मागवण्यासाठी या प्रकरणाची सुनावणी सुरु ठेवली जाईल, असं खंडपीठाने सांगितलं. प्रतिवादी क्रमांक 6 ते 10 (आरोपी कॉमेडियन) यांच्यावरील खटला बंद करण्यात आला आहे, असं खंडपीठाने म्हटलं आहे. तसेच इतर सर्व संबंधित कार्यवाही रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
'इंडियाज गॉट लेटेंटचा' हा भाग 14 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबईतील खार हॅबिटेट येथे शूट करण्यात आला होता. तो नंतर प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमात इन्फ्ल्युएंसर आणि कॉमेडियन्सवर दिव्यांग व्यक्तींबद्दल असंवेदनशील टिप्पणी केल्याबद्दल अनेक फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर वाद पेटून उठलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh: वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'























