Kajol Shocking Statement On Marriage Expiry Date: 'लग्नाला एक्सपायरी डेट असावी...'; काजोलचं वक्तव्य ऐकून ट्विंकल चक्रावली, म्हणाली, 'वॉशिंग मशीन नाहीय...'
Kajol Shocking Statement On Marriage Expiry Date: काजोलनं तिच्या 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' या शोमध्ये लग्नाबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे बराच गोंधळ उडालाय.

Kajol Shocking Statement On Marriage Expiry Date: काजोल (Kajol) आणि ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) यांचा टॉक शो 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' (Two Much With Kajol And Twinkle) पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी या शोमध्ये विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि क्रिती सेनॉन (Kriti Sanon) गेस्ट म्हणून उपस्थित होते. यावेळी गप्पागोष्टींमध्ये लग्नाचा विषय आला आणि काजोलनं केलेल्या एका वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. बॉलिवूडचा (Bollywood News) सिंघम अजय देवगणसोबत (Ajay Devgn) आनंदानं आपलं वैवाहिक आयुष्य जगत असलेली काजोल लग्नाच्या विषयावर मात्र, भलतच काहीतरी बोलून गेली. काजोल म्हणाली की, "लग्नाला एक्सपायरी डेट असली पाहिजे..." बरं काजोल एवढ्यावरच थांबली नाही. ती म्हणाली की, "लायसन्सला असतो तसा, रिन्यूअलचाही ऑप्शन असला पाहिजे..."
काजोलनं तिच्या 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' या शोमध्ये लग्नाबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे बराच गोंधळ उडाला. शोमध्ये बोलताना अगदी कॉमेडी अंदाजात काजोलनं लग्नाची एक्सपायरी डेट असण्याबद्दल तिचं मत व्यक्त केलं. काजोलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काजोलनं वक्तव्य केल्यानंतर शोमध्ये गेस्ट म्हणून आलेले क्रिती सेनॉन आणि विक्की कौशल यांच्याही भुवया उंचावल्या.
नेमकं घडलं काय?
एपिसोड दरम्यान, काजोल बोलण्यात एवढी गुंतली की, तिनं तिच्या स्वतःच्या लग्नाबद्दल एक वेगळंच मत मांडलं. ती म्हणाली की, तिचा असा विश्वास आहे की, लग्नाची एक्सपायरी डेट असावी आणि गरज पडल्यास ती रिन्यू करण्याचा पर्याय असावा.
'दिस ऑर दॅट' या गेम सेगमेंटमध्ये, ट्विंकलनं प्रश्न विचारला की, "लग्नाची एक्सपायरी डेट आणि रिन्यूअल पर्याय असावा का?" कृती, विक्की आणि ट्विंकलनं 'नाही', असं उत्तर दिलं आणि रेड झोनमध्ये प्रवेश केला, तर काजोलनं कॉन्फिडेंस दाखवत 'हो' असं म्हटलं आणि ग्रीन झोनमध्ये गेली.
View this post on Instagram
ट्विंकलनं काजोलला डिवचलं...
काजोलच्या उत्तरानं ट्विंकलही हैराण झाली आणि तिला डिवचत म्हणाली की, "हे लग्न आहे, वॉशिंग मशीन नाही..." पण, काजोल आपल्या मतावर ठाम राहिली आणि म्हटलं की, "मला तर वाटतं, एक्सपायरि डेट असावी... कोण सांगू शकतं की, तुम्ही योग्य वेळी योग्य व्यक्तीसोबतच लग्न कराल? त्यामुळे रिन्यूअलचा पर्याय असायला हवा... आणि एक्सपायरी डेट असेल, तर फार काळ ते लग्न झेलावं लागणार नाही..."
क्रिकी सेनॉन म्हणाली की, "जर काजोल दी या पर्यायानं खूश आहे, तर तिच्या घरी (अजय देवगणसोबत) चांदी आहे..."
काजोल, ट्विंकलनं उघड केलं Ex बाबतचं गुपित
टॉक शोमध्ये ट्विंकलनं विचारलं की, "बेस्ट फ्रेंड्सनी एकमेकांच्या Ex ना डेट करायला हवं की, नाही?" त्यानंतर ट्विंकल उठली आणि तिनं काजोलला मिठी मारली आणि म्हणाली, "आपला एक Ex कॉमन आहे, पण आपण त्याबद्दल बोलू शकत नाही...", त्यानंतर दोघीही हसल्या आणि ग्रीन झोनमध्ये जाऊन उभ्या राहिल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























