Hyuna Shocking Collapse On Stage: सुप्रसिद्ध गायिकेनं ट्रोलिंगला कंटाळून झटपट वजन कमी करण्याचा घातला घाट; लाईव्ह परफॉर्मन्समध्येच स्टेजवर कोसळली VIDEO
Hyuna Shocking Collapse On Stage: या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. बरं वाटल्यानंतर ह्युनानं असं अचानक भोवळ येण्याचं खरं कारणं चाहत्यांना सांगितलं आणि तिच्या चाहत्यांची माफी मागितली.

Hyuna Shocking Collapse On Stage: दक्षिण कोरियाची (South Korea) 33 वर्षांची पॉप स्टार ह्युना (HyunA) अचानक एका लाईव्ह स्टेज परफॉर्मन्स (Live Stage Performance) दरम्यान कोसळली. वॉटरबॉम्ब 2025 मकाऊ म्युझिक फेस्टिवलमध्ये (Waterbomb 2025 Macau Music Festival) तिचं हिट गाणं 'बबल पॉप' (Bubble Pop) सादर करत असताना ही घटना घडली. गाणं गाताना ती अचानक स्टेजवर कोसळली. सुरक्षा कर्मचारी आणि के-पॉप आयकॉनच्या डान्सर्सनी तिला ताबडतोब स्टेजवरुन आत रुममध्ये नेलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. बरं वाटल्यानंतर ह्युनानं असं अचानक भोवळ येण्याचं खरं कारणं चाहत्यांना सांगितलं आणि तिच्या चाहत्यांची माफी मागितली.
View this post on Instagram
जगभरात प्रसिद्ध असलेली के-पॉप स्टार ह्यूना (HyunA) एका कॉन्सर्टदरम्यान अचानक स्टेजवर बेशुद्ध पडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ज्यामुळे जगभरातील तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. ह्यूना तिचं हिट गाणं 'बबल पॉप' गात असताना अचानक कोसळली आणि ही घटना कॅमेरात कैद झाली. ह्यूना स्टेजवरच कोसळल्याचा व्हिडीओ वेगानं व्हायरल झाला आणि चाहते पुरते हादरले.
प्रेग्नन्सीच्या अफवांनी त्रस्त होऊन वजन कमी करण्याचा घाट घातला (Hyuna Collapse On Stage Because Of Strict Diet)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ह्यूनानं गेल्या काही दिवसांत केवळ एका महिन्यात जवळपास 10 किलो वजन कमी केलं होतं, ज्याचा तिच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना केल्यानंतर तिनं डाएट करुन वजन कमी करण्याचं नक्की केलेलं. लग्नानंतर वाढलेल्या वजनामुळे तिच्या प्रेग्नन्सीच्या अफवा पसरू लागल्या. प्रेग्नन्सीच्या अफवांमुळे त्रस्त झालेल्या ह्यूनानं 3 ऑक्टोबरपासून डाएट प्लॅन सुरू केला होता. ती अगदी काटेकोरपणे आपला डाएट प्लान फॉलो करत होती. 4 नोव्हेंबर रोजी तिनं सोशल मीडियावर सांगितलेलं की, तिचं वजन आता 49 किलो झालं आहे.
चाहत्यांची माफी मागितली, वचन दिलं (HyunA Apologizes To Fans)
गरोदरपणाच्या अफवा पसरल्या तेव्हा, ह्युनानं 3 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेलं की, तिनं आपला डाएट प्लान ठरवला असून ती करणार आहे . थोडं बरं वाटल्यानंतर, ह्युनानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांची माफी मागितली. तिनं लिहिलं, "मला माफ करा. मला तुम्हाला एक चांगला परफॉर्मन्स दाखवायचा होता, पण ते घडलं नाही आणि मला प्रामाणिकपणे काहीही आठवत नाही..." तिनं चाहत्यांना आश्वासन दिलंय की, ती आता ठीक आहे आणि ती काही दिवस आराम करणार आहे.
View this post on Instagram
ह्युना बेशुद्ध पडण्याचं नेमकं कारण काय?
कोरियन टाईम्सच्या मते, डॉक्टरांनी ह्यूनाच्या बेशुद्ध पडण्याचं कारण वसुवागल सिन्कोप (Vasovagal Syncope) असल्याचं निश्चित केलं आहे. या आजारात ताण, थकवा, शरीरात पाण्याची कमतरता किंवा अति डाएटिंगमुळे हृदयाची गती, रक्तदाब अचानक कमी होतो, ज्यामुळे व्यक्ती बेशुद्ध पडते. ह्यूनाला ही समस्या 2020 मध्ये पहिल्यांदा झाली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























