(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kajal Agarwal : फोटो काढण्याच्या निमित्ताने धरली अभिनेत्रीची कंबर, काजलसोबत चाहत्याने केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Kajal Agarwal : अभिनेत्री काजल अग्रवाल हिच्यासोबत एका चाहत्याने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान फोटो काढण्याच्या निमित्ताने तिची कंबर धरली.
Kajal Agarwal : अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Agarwal) ही कायम तिच्या भूमिकांमुळे चर्चेत असते. तसेच ती इतर अनेक गोष्टींमुळे तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. अनेकदा ती अनेक इवेंट्सला हजेरी लावते. नुकतच काजल ही तिच्या वडिलांसोबत हैदराबाद येथे एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेली होती. पण या कार्यक्रमात एका चाहत्याने तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आपल्या लाडक्या कलाकरांसोबत फोटो काढण्याची प्रत्येकाची इच्छा असते. असाच काहिसा प्रसंग काजोल सोबत घडला. एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एका चाहत्याने तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.
नेमकं काय घडलं?
हैदराबाद येथील एका स्टोअरच्या उद्घाटनासाठी काजल तिच्या वडिलांसोबत गेली होती. तिथे फोटो काढण्याच्या निमित्ताने एक जण तिच्याजवळ आला. मात्र, चाहत्यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो फोटो क्लिक करताना तिला स्पर्श करताना दिसत आहे. तसेच त्याने तिच्या कंबरेत देखील हात घातल्याचं पाहायला मिळतंय. या व्हिडिओमध्ये काजल खूपच घाबरलेली दिसत होती आणि त्या माणसाला तिच्यापासून दूर जाण्याचा इशारा करत होती. पण काजलने तो हात लगेचच झटकला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहेत.
दरम्यान या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत त्या व्यक्तीच्या वागण्यावर टीका केलीये. त्याचप्रमाणे या व्यक्तीच्या वागण्यावर अनेकांनी आक्षेप घेतलाय. त्या कार्यक्रमादरम्यान काजलसोबत असं जरी झालं असलं तरीही तिने कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ दिला नाही. तसेच तिने चाहत्यांच्या देखील प्रश्नांची उत्तर दिली.
Fan/random Guy Misbehaving with actress #KajalAggarwal in a event🙄🙄 pic.twitter.com/I68WdTbxLl
— Movies & Entertainment (@Movies_Ent_) March 6, 2024
सारा अली खानसोबतही घडला होता हा प्रकार
काजल पहिली अभिनेत्री नाही जिच्यासोबत असा प्रकार घडला आहे. सारा अली खान, अपर्णा बालमुरली, आहाना कुमरा यांच्यासोबतही असे वर्तन करण्यात आले आहे. काजलने 2022 साली मुलगा नीलला जन्म दिला होता. त्यानंतर तिने सिनेमातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान आता तिने तिचं दमदार कमबॅक केलं असून ती तेलुगु चित्रपट 'सत्यभामा' आणि तामिळ चित्रपट 'इंडियन 2' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ही बातमी वाचा :
Actress : वयाच्या 38व्या वर्षी अभिनेत्री झाली चौथ्यांदा आई, शेअर केला लेकीसोबतचा पहिला फोटो