Actress : वयाच्या 38व्या वर्षी अभिनेत्री झाली चौथ्यांदा आई, शेअर केला लेकीसोबतचा पहिला फोटो
वंडर वुमेन फेम अभिनेत्री गैल गैडोटच्या घरी पुन्हा एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
Gal Gadot : हॉलीवूड (Hollywood) अभिनेत्री गॅल गॅडोटच्या (Gal Gadot) घरी पुन्हा एका चिमुकल्याचं आगमन झालं आहे. वयाच्या 38 व्या वर्षी ही अभिनेत्री पुन्हा एकदा आई झालीये. या अभिनेत्रीने एका मुलीला जन्म दिलाय. गॅलने 6 मार्च रोजी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिच्या लेकीसोबतचा फोटो शेअर केलाय. दरम्यान तिच्या या पोस्टमुळे चाहत्यांना एक सुखद धक्का बसला आहे, कारण ती गरोदर असल्याच्या कोणत्याही चर्चा नव्हत्या.
गॅलने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या लेकिचा फोटो देखील शेअर केलाय. या फोटोमध्ये गॅलसुद्धा आहे. हॉस्पिटलमधील हा फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर टाकलाय. लेकिला जवळ घेतल्याचा हा फोटो आहे. तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तसेच तिने या पोस्टवर लिहिलेल्या कॅप्शनची देखील सध्या जोरदार चर्चा होत आहे.
अभिनेत्रीच्या कॅप्शनची चर्चा
या अभिनेत्रीने तिच्या या पोस्टवर कॅप्शन दिलं आहे. माय स्वीट गर्ल, वेलकम! माझ्यासाठी ही प्रेग्नंसी सोपी नव्हती, पण आम्ही हे पार पाडलय, असं कॅप्शन या अभिनेत्रीने या फोटोला दिलंय. तसेच तिने तिच्या या कॅप्शनमध्ये तिच्या लेकीचं नाव देखील सांगितलं आहे. तिने तिच्या लेकीचं नाव ओरी असं ठेवलंय. या शब्दाचा हिब्रूमध्ये प्रकाश असा होतो. या नावाचा अर्थ देखील तिने कॅप्शन दिलं आहे. तिनं म्हटलं की, तिच्या नावाच्या अर्थाला सार्थक करत तिने आमच्या आयुष्यात एक नवा प्रकाश आणला आहे. आमचं मन अगदी आनंदानं भरुन गेलं आहे.
View this post on Instagram
गॅल गॅडोटने 2008 मध्ये जारोन वर्सानोशी लग्न केले. या जोडप्याने 2011 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीचे, अल्माचे स्वागत केले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांची दुसरी मुलगी माया आणि 2021 मध्ये तिसरी मुलगी डॅनिएलाचा जन्म झाला. आता त्यांना चौथी मुलगी झाली आहे. सध्या या अभिनेत्रीच्या चौथ्या लेकीची चर्चा सोशल मीडियावर आहे. तसेच तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा देखील दिल्यात.