Justin Bieber : गूड न्यूज! जस्टिन बीबरच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन, हेलीनं दिला गोंडस बाळाला जन्म, मुलाचं नाव सांगत शेअर केला फोटो
Hailey Bieber Justin Bieber : जस्टिन बीबर आणि हेली यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं असून त्यांनी बाळाचा फोटो शेअर करत चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे.
![Justin Bieber : गूड न्यूज! जस्टिन बीबरच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन, हेलीनं दिला गोंडस बाळाला जन्म, मुलाचं नाव सांगत शेअर केला फोटो justin bieber hailey bieber welcome baby boy become parents share photo of new born son feet reveal his name marathi news Justin Bieber : गूड न्यूज! जस्टिन बीबरच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन, हेलीनं दिला गोंडस बाळाला जन्म, मुलाचं नाव सांगत शेअर केला फोटो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/24/ab0ab69cad0b1030c2397e99a170fe681724482018468322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Justin Bieber & Hailey Bieber Become Parents : इंटरनॅशनल पॉपस्टार गायक जस्टिन बीबरच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. जस्टिन बीबरची पत्नी मॉडेल हेली बीबर हिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. या जोडप्याने आपल्या नवजात बाळाची पहिली झलक चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केली आहे. जस्टिन आणि हेली यांनी लग्नाच्या सहा वर्षानंतर आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे. या वर्षी मे महिन्यात जस्टिन आणि हेलीने चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली होती की, ते लवकरच आई-बाबा होणार आहेत.
जस्टिन बीबरच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन
पॉप सिंगर जस्टिन बीबर (Justin Bieber) आणि त्याची पत्नी हेली बीबर आई-बाबा झाले आहेत. जस्टिनची पत्नी हेलीने बाळाला जन्म दिला आहे. जस्टिनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. यासोबतच त्याने फोटो शेअर करत बाळाची पहिली झलक दाखवली आणि त्याचं नावही सांगितलं आहे. जस्टिन बीबर आणि हेलीचे लग्न 2018 मध्ये झालं, आता बाळाच्या आगमनानंतर दोघांच्याही आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
जस्टिन बीबरच्या मुलाचं नाव काय?
जस्टिन बीबरने इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. जस्टिनने शेअर केलेल्या फोटोमध्ये मुलाचे पाय दिसत आहेत. जस्टिन बीबर आणि हेली बीबर बेबी यांनी नवजात बाळाच्या पायाचा फोटो शेअर केला आहे. जस्टिनने शेअर केलेल्या फोटोमध्ये हेली बीबरच्या हातात बाळाचा पाय दिसत आहे. यासोबत जोडप्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'आमच्या घरात स्वागत आहे, बाळा'. जस्टिनने मुलाचे नाव जॅक ब्लूस बीबर (JACK BLUES BIEBER) असं ठेवलं आहे.
हेलीनं दिला गोंडस बाळाला जन्म
View this post on Instagram
जस्टिन-हेलीचे लग्न कधी झाले?
जस्टिन बीबर आणि हेली यांची भेट 2006 मध्ये झाली होती. त्यावेळी जस्टिन गायिका सेलेना गोमेझला डेट करत होता. सेलेनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर जस्टिनने हेलीला डेट करायला सुरुवात केली. लवकरच दोघांचा ब्रेकअप झाला. पण, त्यांनी 2016 मध्ये पुन्हा डेट करायला सुरुवात केली. दोन वर्षांनंतर, 2018 मध्ये हेली आणि जस्टिननं लग्न केलं.
View this post on Instagram
जस्टिन बीबरचा भारतात मोठा चाहतावर्ग
सुपरस्टार पॉप सिंगर जस्टिन बीबरच्या 'बेबी' या गाण्यापासून भारतात इंग्रजी गाण्यांचा ट्रेंड सुरू झाला. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी ग्रॅमी पुरस्कार पटकावणाऱ्या जस्टिन बीबर च्या नावावर 39 जागतिक विक्रम आहेत. भारतात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नातही त्याने परफॉर्मन्स केला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Entertainment News : पहिल्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन, बिना लग्नाची राहिली गरोदर; ब्रेकअपनंतर आता दुसऱ्याच प्रियकरासोबत अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)