Johnny Depp Defamation Case : जॉनी म्हणाला, 'माझं जीवन परत मिळालं' तर एम्बर म्हणाली, 'खूप दु:ख होतंय'; पोस्ट शेअर करुन दिली पहिली प्रतिक्रिया
'ज्युरीनं मला माझं जीवन परत दिलं आहे. मी त्यांचे आभार मानतो', असं जॉनीनं (Johnny Depp) पोस्टमध्ये लिहिलं आहे.
Johnny Depp on Defamation Case Verdict : हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) आणि त्याची पूर्वाश्रमी पत्नी एम्बर हर्ड (Amber Heard) यांचा हाय-प्रोफाईल मानहानीचा खटल्याचा अखेर निकाल लागला आहे. सहा आठवडे चाललेल्या या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. जॉनी डेप-एम्बर हर्ड मानहानीच्या खटल्यात, न्यायाधीशांनी जॉनी डेपच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयावर आता जॉनी डेपनं प्रतिक्रिया दिली आहे. 'ज्युरीनं मला माझं जीवन परत दिलं आहे. मी त्यांचे आभार मानतो', असं जॉनीनं पोस्टमध्ये लिहिलं आहे.
जॉनीनं हा खटला जिंकल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं आहे, 'सहा वर्षाच्या आधी माझ्या मुलांचे आणि माझ्या जवळच्या लोकांचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते. डोळ्यांसमोर अंधार होता. माझ्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. अनेकांनी मला टार्गेट केले. माझ्या विरोधात काहींनी हेट कंटेंट तयार केला. यामुळे माझ्या करिअरवर आणि माझ्यावर परिणाम झाला. आज सहा वर्षानंतर ज्युरीनं मला माझं आयुष्या पुन्हा दिलं आहे. मी त्यांचे आभार मानतो. मला फक्त सत्य समोर आणायचे होते. '
जॉनीची पोस्ट
View this post on Instagram
एम्बर हर्डनं देखील पोस्ट शेअर करुन प्रतिक्रिया दिली आहे. तिनं पोस्टमध्ये लिहिलं, 'आज मला जे दु:ख होत आहे, ते मी शब्दांमध्ये सांगू शकत नाही. हा खटला हरल्यामुळे माझ्या मनावर आघात झाला आहे. मी एवढे पुरावे सादर केले तरी देखील ते अपूरे ठरले. मी हा खटला हरले आहे. या गोष्टीचे मला खूप दु:ख होत आहे. '
एम्बरची पोस्ट
View this post on Instagram
नेमकं प्रकरण काय?
जॉनी आणि एम्बर 2015 ते 2017 पर्यंत पती-पत्नी होते. त्यानंतर, मे 2016 मध्ये एम्बरने डेपविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला. यानंतर एम्बरने डिसेंबर 2018 मध्ये एका अमेरिकन वृत्तपत्रात एक लेख लिहिला, ज्यात स्वत:ला कौटुंबिक हिंसाचाराचा बळी असल्याचं सांगितलं. यावर जॉनी डेपने एम्बरविरुद्ध खटला दाखल केला आणि 50 दशलक्ष डॉलर नुकसान भरपाई मागितली होती. प्रत्युत्तरादाखल एम्बरने शारीरिक हिंसा आणि छळाचा दावाही करत 100 दशलक्ष डॉलर नुकसान भरपाई मागितली होती.
हेही वाचा :
- Depp vs Amber Case: मानहानीच्या प्रकरणात जॉनी डेपचा विजय! एम्बर हर्डला द्यावी लागणार ‘इतकी’ नुकसान भरपाई
- Johnny Depp, Amber Heard : पती जॉनी डेपवर 10 कोटींचा दावा ठोकला, आता अभिनेत्री एम्बर हर्ड म्हणतेय...
- Amber Heard , Johnny Depp : जॉनी डेप-एम्बर हर्ड कोर्टात आमने-सामने, सुनावणी दरम्यान ‘या’ व्यक्तीला दाखवला गेला बाहेरचा रस्ता!