Jai Bhim चित्रपटातील सीनवरुन वाद शिगेला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Jay Bhim Film update : सध्या सुपरस्टार सूर्या आणि प्रकाश राज यांनी अभिनीत केलेला जय भीम चित्रपटाची खूप चर्चा सुरु आहे. सिनेमातील एका सीनवरुन वाद देखील सुरु झाला आहे.
Jay Bhim Film update : सध्या सुपरस्टार सूर्या आणि प्रकाश राज यांनी अभिनीत केलेला जय भीम चित्रपटाची खूप चर्चा सुरु आहे. एकीकडे सिनेमाचं मोठ्या प्रमाणात कौतुक सुरु असताना दुसरीकडे सिनेमातील एका सीनवरुन वाद देखील सुरु झाला आहे. प्रकाश राज (Prakash Raj) यांच्यावर चित्रित केलेला हा सीन आहे, जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या सीनमध्ये एक वयस्कर माणूस हिंदीमध्ये बोलत आहे. त्यावर प्रकाश राज यांचं पात्र हिंदी ऐकूण भडकतं आणि त्या वयस्क व्यक्तीला कानाखाली लगावतो असा तो सीन आहे. कानाखाली लावताना त्या व्यक्तिला उद्देशून फक्त तमिळमध्ये बोला असंही सुनावतो. यावरुन काही यूजर्सनी आक्षेप घेतला आहे. प्रकाश राज यांचं पात्र हिंदी भाषेचा तिरस्कार करत असल्याचं या सीनमध्ये दाखवलं आहे. हा सीन चित्रपटातून वगळण्याची मागणी केली जात आहे. हा सीन चित्रपटात टाकण्याची काहीही गरज नाही, असं काही यूजर्सचं म्हणणं आहे.
Prakash Raj with his propaganda in the movie ‘Jay Bhim’ where he slaps a person who speaks in Hindi. pic.twitter.com/1SwPVssbK7
— Amit Kumar (@AMIT_GUJJU) November 2, 2021
काही लोकांचा प्रकाश यांना पाठिंबा
काही लोक मात्र अभिनेते प्रकाश राज यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. हा सिनेमाचा भाग आहे. यात हिंदी भाषेविरोधी असं काही नाही. लोकं चुकीच्या पद्धतीनं पाहात आहेत, असं एका यूजरनं म्हटलं आहे. त्या सीनमध्ये तो वयस्क व्यक्ती हिंदी भाषेत बोलत स्वत:ला वाचवू पाहात आहे, असं एका यूजरनं म्हटलं आहे. सिनेमा पाहिल्यानंतर व्यक्त होणं गरजेचं आहे, असंही काहींनी म्हटलं आहे.
1995 सालातल्या सत्य घटनेवर सिनेमा
जय भीम सिनेमा हा प्रादेशिक सिनेमा आहे. जातव्यवस्थेच्या सामाजिक असमतोलातून एका विशिष्ट समुहाला लक्ष्य केलं जाणंच किती वेदनादायी आहे. उच्चवर्णिय आणि जमीनदारांना प्रशासनाची आणि पोलीसांची साथ मिळाल्यावर काय होते. खोट्या केसेस टाकून एका आदिवासी आणि मागासवर्गाची कशी पिळवणूक केली जाते हे या सिनेमात दाखवलं गेलंय.
तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातल्या 1995 सालातल्या सत्य घटनेवर हा सिनेमा बेतलाय. रखडलेल्या खून, दरोडा, चोरीच्या केसेस पूर्ण करण्यासाठी थेट आदिवासींना उचलायचं, पोलीस कोठडीत त्यांना मार मार मारायचं, इतकं मारायचं की ते न केलेला गुन्हाही मान्य करतील. या वंचित लोकांसाठी लढणाऱ्या एका वकिलाची ही कथा आहे. सुपरस्टार सूर्या, प्रकाश राज, मनिकंदन, गुरू सोमसुंदरम, अभिनेत्री लिजो मोल जोस, राजिशा विजयन या कलाकरांनी यात चांगल्या भूमिका केल्या आहेत.