एक्स्प्लोर

52 लाखांचा घोडा, 36 लाखांच्या मांजरींचं गिफ्ट! जॅकलिनला महागात पडणार; गिफ्ट देणारा सुकेश कोण?

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) महागडी जनावरं गिफ्ट घेणं प्रचंड महागात पडणार आहे. सुकेश चंद्रशेखर (Sukesh ChandraShekhar) नं तिला हे गिफ्ट दिलं होतं. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय..

मुंबई : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) महागडी जनावरं गिफ्ट घेणं प्रचंड महागात पडणार आहे. कारण 200 कोटींच्या अपहाराप्रकरणी चौकशीच्या घेऱ्यात असलेल्या सुकेश चंद्रशेखर (Sukesh ChandraShekhar) या उद्योगपतीने एकूण 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलंय. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे आणि ही सगळी माहिती, ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये देण्यात आली आहे. 

जॅकलीनला घोडा आणि मांजर गिफ्ट करणारा सुकेश चंद्रशेखर कोण ?

सुकेश चंद्रशेखर हा बंगळुरुतला एक उद्योगपती आहे 

सुरुवातीला नोकरी देण्याच्या आमिषाने त्याने अनेकांची फसवणूक केली 

75 जणांचे 100 कोटी रुपये घेऊन त्याने पोबारा केला... 

वयाच्या 17 व्या वर्षी त्याला पहिल्यांदा अटक झाली

राजकारण्यांच्या नावाने सव्वा कोटी रुपये त्याने उकळले होते 

कधी करुणानिधी, कधी कुमारस्वामी, कधी जयललितांच्या नावाचा वापर केला 

2017 मध्ये तामिळनाडूच्या राजकारणात त्याने डील करण्याचा प्रयत्न केला

निवडणूक आयोगात ओळख असल्याचं सांगून हवं ते चिन्ह मिळवून देण्याचं आमिष त्यानं दाखवलं 

याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी त्याला 2017 मध्ये अटक केली 

आणि त्याच्या हॉटेल रुममध्ये सव्वा कोटी रुपये जप्त केले 

पण त्यानंतरही सुकेशने दिल्लीतल्या तुरुंगातूनच खंडणी वसुली सुरु केली 

सुकेशवर 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे 

2013 मध्ये चेन्नईच्या कॅनरा बँकेलाही त्याने चुना लावला

या प्रकरणी त्याची गर्लफ्रेन्ड लीना मारिया पॉललाही अटक झाली 

रवी पुजारी गँगने तिच्या ब्यूटी पार्लरवरही गोळीबार केला होता 

नोरा फतेही देखील सुकेशच्या उधळपट्टीची लाभार्थी
पण फक्त जॅकलीनच नाही तर नॅशनल क्रश नोरा फतेही देखिल सुकेशच्या उधळपट्टीची लाभार्थी होती अशीही माहिती समोर आली आहे.  आरोपपत्रातल्या आरोपानुसार सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेहीला एक बीएमडब्ल्यू कार आणि एक आयफोनही गिफ्ट केला होता.. ज्याची एकूण किंमत ही 1 कोटींच्या आसपास होती. इतकंच नाही  तर सुकेश जेव्हा जेलमध्ये होता. तेव्हाही फोनद्वारे जॅकलीनच्या संपर्कात होता. जेव्हा तो जामिनावर बाहेर आला. तेव्हा त्याने दिल्लीहून चेन्नईला जाण्यासाठी एक चार्टर्ड फ्लाईट बुक केली  आणि त्यानंतर जॅकलीन आणि सुकेश हे एका हॉटेलमध्ये दोन दिवस एकत्र होते.  सुकेशने केवळ हवाई प्रवासासाठी तब्बल 8 कोटी खर्च केले होते. 

सुकेश जेव्हा तिहार तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर काढलेला हा सेल्फी असल्याचा दावा केला जातोय. आणि त्यामुळेच सुकेश आणि जॅकलीनचे घनिष्ट संबंध चव्हाट्यावर आले. आणि त्यामुळेच सलमानची ही क्लोज फ्रेन्ड आता अत्यंत मोठ्या संकटात सापडली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra assembly election Voting turnout 2024: राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
Voting Percentage in Mumbai City : मुंबई शहर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत माहीममध्ये सर्वाधिक तर कुलाबा मतदारसंघात कमी मतदान, जाणून घ्या आकडेवारी
मुंबई शहरमधील 10 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान, जाणून घ्या आकडेवारी? 
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Votting Superfast | विधानसभेसाठी मतदान, राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवरCM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra assembly election Voting turnout 2024: राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
Voting Percentage in Mumbai City : मुंबई शहर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत माहीममध्ये सर्वाधिक तर कुलाबा मतदारसंघात कमी मतदान, जाणून घ्या आकडेवारी
मुंबई शहरमधील 10 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान, जाणून घ्या आकडेवारी? 
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
Embed widget