Isha Koppikar On Nagarjun: 'नागार्जुननं मला 14 थोबाडीत मारल्या... गालावर वण उठलेले..'; बॉलिवूडच्या सुपरस्टार अभिनेत्रीनं सांगितला 'तो' किस्सा
Isha Koppikar On Nagarjun: ईशा कोप्पीकरनं एका सिनेमाच्या शुटिंगवेळी साऊथ सुपरस्टार नागार्जुननं तिला तब्बल 14 थोबाडीत मारल्याचं सांगितलं आहे.

Isha Koppikar On Nagarjun: प्रसिद्ध अभिनेत्री ईशा कोप्पीकरनं (Isha Koppikar) अनेक बॉलिवूड (Bollywood) आणि दक्षिणात्या सिनेमांमध्ये (South Movie) महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात. आजही तिच्या सौंदर्यावर कित्येक तरुण घायाळ होतात. बराच काळ रुपेरी पडद्यापासून दूर असलेल्या ईशा कोप्पीकरनं नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तिनं साऊथ सुपरस्टार नागार्जुन (Nagarjun) अक्किनेनीसोबतच्या सिनेमाच्या शुटिंगचा किस्सा सांगितला. त्यावेळी नागार्जुननं मला तब्बल 14 थोबाडीत मारलेल्या, असं ईशानं सांगितलं. दरम्यान, ईशानं सांगितलेला किस्सा 1998 च्या 'चंद्रलेखा' सिनेमातील एक दृश्य आहे.
नागार्जुननं मारल्याचा खुलासा करताना ईशा कोप्पीकरनं सांगितलं की, "मला नागार्जुननं 14 थोबाडीत मारल्या, पण मी कमिटेड एक्ट्रेस आहे, मला अगदी खरीखुरी, मेथड अॅक्टिंग करायची होती. त्यामुळे त्यानं ज्या थोबाडीत मारलेल्या, त्या मला जाणवतच नव्हत्या..."
नागार्जुननं सर्वांदेखत ईशाला 14 थोबाडीत मारल्या
ईशानं बोलताना सांगितलं की, हा तिचा दुसरा चित्रपट होता आणि तिनं नागार्जुन अक्किनेनीला तिला थोबाडीत मारायला सांगितलं. जेव्हा ईशानं सांगितलं की, थोबाडीत मारा, त्यावेळी नागार्जुननं तिला विचारलं, "तुला खात्री आहे ना तू काय बोलतेयस?" त्यानंतर ईशानं त्याला समजावून सांगितलं की, योग्य भावना दर्शविण्यासाठी तिला थोबाडीत मारण्याची गरज आहे. ईशा पुढे म्हणाली की, "मला ते जाणवत नाहीये. त्या बिचाऱ्या माणसानं थोबाडीत मारलेल्या, पण अगदी प्रेमानं..."
थोबाडीत मारल्यानंतर गालावर वण उठलेले...
ईशा कोप्पीकर म्हणाली की, "पण, दिग्दर्शक म्हणाले की, 'ईशा, तुला थोबाडीत मारल्या जातायत...' त्यात माझा दुसरा प्रॉब्लेम आहे की, मी खऱ्याखुऱ्या आयुष्यात खूप चिडते, कॅमेऱ्यासमोर मात्र मला राग येतंच नाही. मला नाही माहीत नेमका इश्यू काय आहे... या सगळ्या गोंधळातच मी तब्बल 14 थोबाडीत खाल्ल्यात... मग त्यानंतर मात्र माझ्या गालावर वण उठलेले..."
नागार्जुननं मागितलेली माफी
ईशा कोप्पीकरनं पुढे बोलताना सांगितलं की, "मला चांगलं आठवतंय की, नागार्जुननं त्या सीननंतर माझी माफी मागितलेली. तो बिचारा सारखा मला सॉरी सॉरी म्हणत होता..." त्यानंतर मी त्यांना सांगितलं की, मला अजिबात सॉरी म्हणू नका.
दरम्यान, ईशानं ज्या सिनेमाच्या शुटिंगवेळचा किस्सा सांगितला तो सिनेमा म्हणजे, 'चंद्रलेखा'. 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमात नागार्जुन आणि ईशा यांच्यासोबत रम्या कृष्णा देखील या सिनेमाचाच भाग होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























