TMKOC Actress Jennifer Mistry Accuses Producer: 'तुझे ओठ खूपच से%$... किस करावसं वाटतंय..." 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्रीचे निर्मात्यांवर खळबळजनक आरोप
TMKOC Actress Jennifer Mistry Accuses Producer: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील अभिनेत्रीनं निर्मात्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत.

TMKOC Actress Jennifer Mistry Accuses Producer Asit Kumarr: टेलिव्हिजन (Television News) जगतातील सर्वात लोकप्रिय शो, 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah). गेल्या दशकाहून अधिक काळ हा शो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. पण, गेल्या काही दिवसांपासून हा शो वादात सापडला आहे. शोमध्ये श्रीमती रोशन सोधीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालनं (Jennifer Mistry Bansiwal) शोचे निर्माते असित कुमार मोदी (Asit Kumarr Modi) यांच्यावर अतिशय खळबळजनक आरोप केले आहेत.
पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत, जेनिफर मिस्त्री यांनी ज्या घटनांमुळे असित मोदींवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. तसेच, उघडपणे यावर भाष्यही केलं होतं. जेनिफरनं 2018 मध्ये शोचे ऑपरेशन्स हेड सोहेल रमाणी यांच्याशी झालेल्या वादाची आठवण करून दिली. तिनं दावा केला की, सोहेल यांनी फोनवर तिच्याशी गैरवर्तन केलं. या घटनेत दुखावलेल्या जेनिफरनं असित मोदींची मदत घेण्याचा निर्णय घेतला. पण, जेनिफरला धक्का तेव्हा बसला, जेव्हा मदतीसाठी असित मोदींकडे गेलेल्या जेनिफरसोबत मोदींनीही गैरवर्तन केलं.
जेनिफर मिस्त्री म्हणाली की, "मी माझ्यासोबत सोहेलनं जे गैरवर्तन केलं, त्याबाबत तक्रार करण्यासाठी असित मोदींकडे गेले. पण, ज्यांच्याकडे मदतीसाठी गेले, त्यांनीच तुम्ही सेक्सी दिसताय, असं म्हणत विचित्र वागायला सुरुवात केली." पुढे बोलताना जेनिफरनं 2022 मध्ये घडलेल्या आणखी एका घटनेचा उल्लेख केला, जेव्हा तिनं स्वित्झर्लंडला जाण्यासाठी व्हिसा मागितला. फोनवरच्या संभाषणादरम्यान ती रडू लागली. मग तिच्या म्हणण्यानुसार, असित मोदी म्हणाले, "तू का रडतेयस? जर तू इथे असतास, तर मी तुला मिठी मारली असती... मी नक्कीच एक संधी घेतली असती. तुला माझी अजिबातच पर्वा नाही..."
असित मोदी यांनी जेनिफरला आपल्या रूमध्ये बोलावलेलं...
जेनिफर मिस्त्रीनं 2019 मध्ये सिंगापूरमध्ये झालेल्या शुटिंगवेळी झालेल्या घटनेचाही खुलासा केला. ती म्हणाली की, "8 मार्च 2019 रोजी आम्ही शूट करत होतो. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले की, तुझी रूममेट तर दररोज बाहेर निघून जाते... तू माझ्या रूममध्ये येऊन व्हिस्की का नाही पित? एकटी बोर होत असशील..."
असित मोदींना जेनिफर मिस्त्रीला किस करायचं होतं...
जेनिफरनं सांगितलं की, सुरुवातीला तिनं अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण नंतर तिला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं. त्याच सिंगापूर ट्रिप दरम्यान, एका कॉफी शॉपमध्ये आणखी एक त्रासदायक घटना घडली. जेनिफरच्या म्हणण्यानुसार, असित मोदी तिच्या खूप जवळ आला आणि म्हणाला, "तुझे ओठ खूप सेक्सी आहेत. मला तुला धरून किस करायचंय. हे ऐकून मला खूप भीती वाटली. माझे हातपाय थंड पडले..."
जेनिफरनं पुढे दावा केला की, असित मोदी त्याची को-स्टार मोनिका भदोरियाशीही फारच विचित्र बोललेला. अभिनेत्रीनं सांगितलं की, "त्यानं मोनिकाला विचारलं की, तुझे किती बॉयफ्रेंड आहेत?" जेनिफरनं उघड केलं की, तिनं तिचा को-स्टार मंदार चांदवडकरलाही असित मोदीच्या कृतींबद्दल सांगितलं होतं, पण त्यानं अभिनेत्रीची बाजू घेतली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























