Indian Idol 12 Pawandeep Rajan Health Update: Indian Idol 12 चा विजेता पवनदीप ICU मध्ये, हात-पाय फ्रॅक्चर, डोक्याला गंभीर दुखापत
Indian Idol 12 Pawandeep Rajan Health Update: 'इंडियन आयडल सीझन 12' या सिंगिंग रिअॅलिटी शोचा विजेता आणि त्याच्या सिंगल्ससाठी प्रसिद्ध असलेला पवनदीप राजनचा भीषण कार अपघात झाला.

Indian Idol 12 Pawandeep Rajan Health Update: 'इंडियन आयडल 12'चा (Indian Idol 12) विजेता पवनदीप राजनचा (Pawandeep Rajan) भीषण अपघात (Accident Updates) झालाय. 5 मे रोजी झालेल्या भीषण कार अपघातात, पवनला गंभीर दुखापत झाली असून त्याचा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सध्या त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. उत्तराखंडहून दिल्लीला येत असताना गजरौलाजवळ ड्रायव्हरला झोप लागली आणि हा अपघात झाला, ज्यामध्ये पवनदीपचा हात आणि पाय फ्रॅक्चर झाले आहेत. तर डोक्यालाही इजा झाली आहे.
'इंडियन आयडल सीझन 12' या सिंगिंग रिअॅलिटी शोचा विजेता आणि त्याच्या सिंगल्ससाठी प्रसिद्ध असलेला पवनदीप राजनचा भीषण कार अपघात झाला. सध्या त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. अपघातानंतर पवनदीपला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उत्तराखंडहून दिल्लीला येत असताना, गजरौला इथे पवनदीपच्या गाडीचा ड्रायव्हर राहुल सिंहला झोप लागली आणि त्याची हेक्टर कार एका कॅन्टरला धडकली, ज्यामुळे पवनदीपचे त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय फ्रॅक्चर झालेत. तसेच, त्याच्यासोबत गाडीत असलेले दोन साथीदारही जखमी झाले आहेत.
मिडिया रिपोर्ट्सनुसार, पवनदीपचा अपघात अहमदाबादमध्ये झाला. पण, काहींचं म्हणणं असं आहे की, ही दुर्घटना उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये झाली. हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, ड्रायव्हर राहुल सिंहला डुलकी आल्यानं मोठा अपघात झाला. ज्यामुळे गायक गंभीर जखमी झालाय.
पहाटे 3.40 च्या सुमारास पवनदीप राजनचा अपघात झाला. त्याचे व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये पवनदीप राजनला गंभीर दुखापत झाल्याचं दिसतंय.
दरम्यान, पनवदीपनं 'इंडियन आयडल 12'चा किताब पटकावला होता. त्यानं एक कार आणि 25 लाख रुपयांचं रोख बक्षीस जिंकलं होतं.























