Hrithik Roshan-Saba Azad : पुन्हा एकदा एकमेकांचा हात पकडून फिरताना दिसलं कपल! कॅमेरा पाहताच हृतिकने लपवला चेहरा!
Hrithik Roshan-Saba Azad : हृतिक आणि सबा पुन्हा एकदा एकमेकांचा हात धरून डिनर डेटसाठी जाताना दिसले. कॅफेमधून बाहेर येताच पापाराझींनी या कपलला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.
Hrithik Roshan Affair : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या चर्चेचा एक भाग बनला आहे. यावेळी तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अलीकडेच हृतिक अभिनेत्री सबा आझादसोबत (Saba Azad) दिसला होता. आता पुन्हा एकदा हृतिक आणि सबा डिनर डेटवर गेले होते. ज्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
हृतिक आणि सबा पुन्हा एकदा एकमेकांचा हात धरून डिनर डेटसाठी जाताना दिसले. कॅफेमधून बाहेर येताच पापाराझींनी या कपलला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. मात्र, दोघेही यावेळी पापाराझींना टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते.
कॅमेरापासून लपण्याचा प्रयत्न
यादरम्यान सबाने तिचा चेहरा केसांनी झाकून घेतला होता, तर हृतिकही टोपीने चेहरा लपवताना दिसला. यावेळीही हृतिकने सबाचा हात धरला होता. त्यांच्या डिनर डेटचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये हृतिकचा स्पोर्टी लूक दिसला. त्याने निळ्या चेक्स शर्टसह, पांढरा टी-शर्ट परिधान केलं होतं आणि हलक्या क्रीम रंगाची पँट घातली होती. दुसरीकडे, सबाने लाईट ब्लू डेनिमसह पिवळा टॉप परिधान केला होता.
सबा आणि हृतिकला पुन्हा एकदा एकत्र पाहून, त्यांच्या डेटींगच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. मात्र, दोघांनीही यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा त्यांच्या नात्याबद्दल वा डेटिंगबद्दल चाहत्यांना काहीही सांगितलेले नाही. परंतु, सध्या हृतिक या मुलीमुळे प्रचंड चर्चेचा विषय बनला आहे.
हृतिक लवकरच 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) या चित्रपटातून दिसणार आहे. हा चित्रपट तमिळचा रिमेक आहे. राधिका आपटे आणि सैफ अली खान यांचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. तसेच, दीपिका पदुकोणसोबत तो फायटर या चित्रपटातही दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Hrithik Roshan Birthday: 48 व्या वाढदिवसाला ह्रतिकच्या घरात नव्या पाहुण्याची एन्ट्री; खास पोस्ट केली शेअर
- Hrithik Roshan : ठरलं! ऋतिक रोशन 'विक्रम वेधा'चा खलनायक, 'या' दिवशी होणार पहिला लूक प्रदर्शित
- Vikram Vedha First Look : वाढदिवसानिमित्त हृतिककडून चाहत्यांना खास गिफ्ट, शेअर केला 'वेधा' चा फर्स्ट लूक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha