Hrithik's Mystery Girl : हृतिक रोशनच्या आयुष्यातील 'ही' मिस्ट्री गर्ल नेमकी आहे तरी कोण? जाणून घ्या...
Hrithik Relationship Status : हृतिक रोशन सध्या त्याच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे चर्चेत आहे. नुकताच तो एका मिस्ट्री गर्लबरोबर स्पॉट झाला होता. त्याच्या बरोबर ही मुलगी नेमकी कोण हा चर्चेचा विषय बनला आहे.
Hrithik Roshan Dating Rumour : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) हा आतापर्यंत त्याच्या एक्स बायको सुसैन खानसोबतच्या (Sussane khan) घटस्फोटामुळे प्रचंड चर्चेत असायचा. त्यामुळे तो सार्वजनिक ठिकाणीही हृतिक फार कमी दिसत होता. मात्र, नुकताच हृतिकचा असा एक अंदाज समोर आला आहे ज्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. यामुळे हृतिक सोशल मिडीयावर पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेचा विषय ठरतोय.
खरंतर, हृतिक रोशन आज अचानक त्याच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी तो एका रेस्टॉरंटच्या बाहेर दिसला. यावेळी हृतिकबरोर एक मुलगी दिसली, जिचा त्याने हात धरला होता. आणि हाच लोकांच्या चर्चेचा विषय ठरला. खरंतर तेव्हा हृतिकबरोबर त्याच्या बहिणी पश्मीना आणि सुनैना देखील उपस्थित होत्या. ते सर्व एकत्र जेवायला गेले होते. पण, या मिस्ट्री गर्लने मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, त्या मुलीने आपला चेहरा लपविण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड प्रमाणात व्हायरलदेखील झाला आहे. या व्हिडीओवर अनेक चाहत्यांच्या कमेंट्सही येत आहेत. व्हिडीओवर कमेंट करत चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यावर एका चाहत्याचे असं म्हणणं आहे की, ती मुलगी सबा आझाद (Saba Aazad) आहे. जी एक संगीतकार आहे. तसेच, तिने अलीकडेच नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांचा मुलगा इमादसोबत काम केले आहे. परंतु, असे असले तरी हृतिकच्या चाहत्यांना मात्र, हृतिक खरंच त्या मिस्ट्री गर्लला डेट करतोय का? याबाबत उत्सुकता आहे.
हृतिकचे आगामी चित्रपट
ती मिस्ट्री गर्ल नेमकी कोण आहे आणि हृतिकबरोबर तिचे नाते काय हे येणारा काळंच सांगेल. परंतु, सध्या हृतिक या मुलीबरोबर प्रचंड चर्चेचा विषय आहे. हृतिक लवकरच 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) या चित्रपटातून दिसणार आहे. हा चित्रपट तमिळचा रिमेक आहे. राधिका आपटे आणि सैफ अली खान यांचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. तसेच, दीपिका पदुकोणसोबत तो फायटर या चित्रपटातही दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Hrithik Roshan Birthday: 48 व्या वाढदिवसाला ह्रतिकच्या घरात नव्या पाहुण्याची एन्ट्री; खास पोस्ट केली शेअर
- Hrithik Roshan : ठरलं! ऋतिक रोशन 'विक्रम वेधा'चा खलनायक, 'या' दिवशी होणार पहिला लूक प्रदर्शित
- Vikram Vedha First Look : वाढदिवसानिमित्त हृतिककडून चाहत्यांना खास गिफ्ट, शेअर केला 'वेधा' चा फर्स्ट लूक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha