एक्स्प्लोर
Satara Doctor Case : 'पुरावा मिळाला तर सोडणार नाही', महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी फडणवीसांचा इशारा
साताऱ्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून (Satara Doctor Suicide Case) राजकारण तापले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्वॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही पण राजकारण करू नका,' असा थेट इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. एका तरुण डॉक्टरने अशाप्रकारे आत्महत्या करणे ही अत्यंत दुःखद आणि गंभीर घटना असल्याचे ते म्हणाले. या संवेदनशील विषयावर विरोधी पक्षांकडून राजकारण करण्याचा प्रयत्न होत असून, हे अत्यंत चुकीचे आणि असंवेदनशीलतेचे लक्षण आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
अकोला
नाशिक
Advertisement
Advertisement


















