Hema Mailini On Dharmendra Health Reports: 'बरं होणाऱ्या माणसाबद्दल अफवा कशा पसरवू शकता...'; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवांवर हेमा मालिनी चिडल्या, ट्वीट करत म्हणाल्या...
Hema Mailini On Dharmendra Health Reports: धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिले आहेत आणि अफवा पसरवल्याबद्दल मीडियाला फटकारलं आहे.

Hema Mailini On Dharmendra Health Reports: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्यावर सध्या मुंबईतील (Mumbai News) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू आहेत. अशातच धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर थेट धर्मेंद्र यांच्या निधनाचं वृत्त समोर आलं. माध्यमांवर सातत्यानं धर्मेंद्र आणि त्यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरत असल्यामुळे देओल कुटुंबीय सातत्यानं सोशल मीडियावर माहिती शेअर करतंय. तसेच, धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना अफवा आणि खोट्या बातम्या पसरवण्यापासून दूर राहण्याचं आवाहनंही केलंय.
सनी देओलच्या टीमनं सर्वात आधी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट जारी केलं. त्यानंतर ईशा देओलनंही माध्यमांवर फिरत असलेल्या अफवा आहेत, तिचे वडील धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती दिली. तसेच, लोकांना खोट्या अफवा पसरवण्यापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. अशातच आता धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिले आहेत आणि अफवा पसरवल्याबद्दल मीडियाला फटकारलं आहे.
What is happening is unforgivable! How can responsible channels spread false news about a person who is responding to treatment and is recovering? This is being extremely disrespectful and irresponsible. Please give due respect to the family and its need for privacy.
— Hema Malini (@dreamgirlhema) November 11, 2025
हेमा मालिनी यांनी काय म्हटलंय?
हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट देताना म्हटलंय की, "जे घडतंय ते अक्षम्य आहे! जबाबदार चॅनेल्स उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि बरे होणाऱ्या माणसांबद्दल खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत अनादर करणारं आणि बेजबाबदार आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेचा आदर करा..."
View this post on Instagram
ईशा देओलनंही पोस्ट करुन वडिलांच्या मृत्यूच्या अफवा फेटाळल्या
धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी कळताच, ईशानं लगेचच चुकीची माहिती दूर करण्यासाठी पोस्ट केली. तिनं लिहिलंय की, "माझे वडील स्थिर आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारतेय. आम्ही सर्वांना आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतोय. माझ्या वडिलांसाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांबद्दल धन्यवाद."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























