Majha Katta : हास्यजत्रेतील 'लॉली' अर्थात नम्रता संभेरावच्या खास दिवाळी शुभेच्छा, हसून लोटपोट व्हाल, पाहा VIDEO
Hasyajatra on Majha Katta : हास्यजत्रा कार्यक्रमातील कलाकार माझा कट्टा या कार्यक्रमात आली होती, यावेळी त्यांनी मनसोक्त गप्पा मारत आपल्या अनेक आठवणा गाजवल्या. नम्रता संभेरावने सर्वांचच मनोरंजन केलं.
Namrata Sambherao on Majha Katta : सध्या प्रेक्षकांना कॉमेडी कार्यक्रम आणि सिनेमे पाहायला खास आवडतं, त्यामुळेच मागील काही काळात सोनी मराठी वाहिनीवरील हास्यजत्रा हा कार्यक्रम तुफान लोकप्रिय होत आहे. दरम्यान या कार्यक्रमाची टीम नुकतीच एबीपी माझाच्या कट्ट्यावर(Majha Katta) आली होती. यावेळी कलाकारांनी त्यांच्या खास आठवणी, सेटवरील मजा-मस्ती, एकमेंकाबद्दलच्या विविध गोष्टी सांगतिल्या. तसंच अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) हीने देखील खास तिने गाजवलेल्या लॉली पात्राचा अभिनय करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
तर लॉली हे नम्रताने गाजवलेलं कॅरेक्टर एका इर्साल मुलीचं असून ती मुद्दाम येत नसतानाही इंग्रंजी बोलायचा प्रयत्न करते, ज्यानंतर तिच्या इंग्रंजीतून जोक होतात. आताही तिने दिवाळीच्या शुभेच्छा अनोख्यारितीनं दिल्या, ज्या ऐकूनही सर्वांनाच हसू आलं. तर यावेळी लॉलीने दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिवा ज्याला इंग्रजीत लॅम्प (Lamp) म्हणतात तेच डोक्यात ठेवून दिवाळीच्या नाही तर 'लॅम्पलीच्या हार्दिक शुभेच्छा!' असं म्हणाली. विशेष म्हणजे शुभेच्छा दिल्यावर तिने या शुभेच्छांचा अर्थही सांगितला.
पाहा लॉलीनं दिलेल्या खास दिवाळीच्या शुभेच्छा-
View this post on Instagram
लॉली भूमिकेबद्दल सांगितला होता खास किस्सा
याआधी लॉली पात्राबद्दल नम्रतानं सांगताना तिच्या बालपणीचे काही किस्से देखील सांगितले होते. ती म्हणाली होती,'मला लहानपणी गरबा आणि दांडिया खेळायला आवडायचं. नवरात्रीला दररोज मी दांडिया खेळायला जायचं. दसऱ्याला बक्षीस समारंभ असायचा. या समारंभात मला बक्षीस म्हणून मला खड्याळ मिळायचं. यावेळी अनेक चाळीतील वेगवेगळे लोक असायचे. माझं निरीक्षण चांगलं आहे. मी आधी चाळीमध्येच राहत होते. लालबाग-काळाचौकी येथे माझं माहेर. त्यामुळे तिथे आजूबाजूच्या लोकांचे मी निरीक्षण करत होते. त्यातूनच लॉली पात्र साकारलं असं ती म्हणाली. 'लॉली साकारण्यामागे माझा एकटीचा वाटा नाही. प्रसाद खांडेकर, सचिन गोस्वामी या लोकांचा वाटा आहे. ' असंही ती म्हणाली.
हे देखील वाचा-