Majha Katta : सोबतच्यांना काम मिळवूनही गौरवचा अनेकवर्षे स्ट्रगल, पण आज अव्वल विनोदवीरांमध्ये नाव, कट्ट्यावर सांगितल्या खास आठवणी
Hasyajatra on Majha Katta : सध्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या हास्यजत्रा कार्यक्रमातील कलाकार माझा कट्टा या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी मनसोक्त गप्पा मारत आपल्या अनेक आठवणा गाजवल्या.
Gaurav More on Majha Katta : हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमाची टीम नुकतीच एबीपी माझाच्या कट्ट्यावर(Majha Katta) आली होती. यावेळी कलाकारांनी त्यांच्या खास आठवणी, सेटवरील मजा-मस्ती, एकमेंकाबद्दलच्या विविध गोष्टी सांगतिल्या. दरम्यान सध्या आघाडीवर असणारा विनोदवीर गौरव मोरे (Gaurav More) याची कारकिर्द खरंच प्रेरणादायी असून त्याने यावेळी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. गौरव मोरे हा महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून सध्या घराघरात पोहोचला आहे. त्याची कॉमेडी आणि खट्याळ अभिनय सर्वांनाच आवडतो. आता तो प्रसिद्ध असून नुकताच एका सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनलाही गेला होता. पण गौरवनं इथवर पोहोचण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे.
याबद्दल बोलताना त्याने आपल्या काही जुन्या आठवणी सांगितल्या. हास्यजत्रेमधील दुसरा विनोदवीर प्रसाद खांडेकर आणि गौरव हे मागील बरीच वर्षे एकत्र आहेत, त्यांनी ऑडीशन देण्याची सुरुवातही एकत्र केली होती, सध्या हास्यजत्रेचे दिग्दर्शक, लेखक सचिन गोस्वामी, सचिन मोटे यांनी विविध वाहिण्यांसाठी विविध कार्यक्रम केले असून त्यांच्या या कार्यक्रमांसाठी पूर्वीपासून गौरव ऑडीशन देत होता. दरम्यान प्रसाद खांडेकरला काम मिळाल्यानंतरही गौरवला मात्र अनेकदा नकारच आला. अखेर सोनी मराठीवर आलेल्या हास्यजत्रा कार्यक्रमाच्या ऑडिशनमध्ये गौरवला संधी मिळाली. अनेकदा ऑडीशनमध्ये फेल झाल्यावरही गौरवनं प्रयत्न सोडले नसल्याने त्याची चिकाटी पाहून त्याला अखेर संधी दिल्याचं गोस्वामी आणि मोटे यांनी सांगितलं. ज्यानंतर गौरवनंही संधीचं सोनं करत हास्यजत्रा कार्यक्रम चांगलाच गाजवला. दरम्यान गौरव आणि हास्यजत्रा टीमने सांगितलेल्या या आठवणींवरुन गौरवनं मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यश कसं मिळवलं हे दिसून येतं.
'लंडन मिसळ' सिनेमासाठी नुकतीच गौरवची लंडनवारी
जालिंदर गंगाराम कुंभार दिग्दर्शित 'लंडन मिसळ' (London Misal) या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली होती. दरम्यान या सिनेमामध्ये अभिनेता भरत जाधवसोबत गौरव मोरे झळकणार असून याच्या शूटसाठी मागील काही काळ गौरव लंडन येथे होता. लंडन मिसळ सिनेमा त्याचं हटके नाव, विनोदी कलाकार आणि लंडनचं लोकेशन यामुळे हा चित्रपट नेमका कसा असेल, यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहीलेल्या एका नाटकावरून प्रेरित होऊन या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये सुरु असून वर्षअखेरीस 'लंडन मिसळ' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.