दररोज फक्त 10 रुपये कमवायचा 'हा' अभिनेता; पोट भरण्यासाठी एक प्लेट 'छोले-चावल', मग नशीब फळफळलं अन् आज करतोय बॉलिवूडवर राज्य
Harshvardhan Rane Struggle Life: 'सनम तेरी कसम' सिनेमामुळे हर्षवर्धनला मोठी प्रसिद्धी मिळाली. अशातच आता त्याचा 'एक दिवाने की दिवानियात'ही चर्चेत आहे.

Harshvardhan Rane Recalls His Salary: सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) एक सिनेमा प्रचंड गाजतोय, एवढा की, त्यानं 145 कोटींमध्ये बनलेल्या आयुष्मान खुराणा (Ayushmann Khurrana) आणि रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) 'थामा'ला पछाडलं आहे. तो सिनेमा म्हणजे, हर्षवर्धन राणेचा (Harshvardhan Rane) 'एक दिवाने की दिवानियात' (Ek Deewane Ki Deewaniyat). फक्त 25 कोटींच्या या सिनेमानं धुवांधार कमाई केली आहे. तसेच, या सिनेमानं 100 कोटींचा गल्ला जमवला आहे. 'सनम तेरी कसम' सिनेमामुळे हर्षवर्धनला मोठी प्रसिद्धी मिळाली. अशातच आता त्याचा 'एक दिवाने की दिवानियात'ही चर्चेत आहे. अशातच एका वृ्त्तसंस्थेशी बोलताना हर्षवर्धन राणेनं त्याच्या सुरुवातीच्या काळातील संघर्षाची आठवण करुन दिली. त्याच्या आयुष्यातले काही दिवस असेही होते की, त्यावेळी त्याला फक्त दहा रूपये रोज मिळायचा आणि तो फक्त एक प्लेट 'छोले-चावल' खाऊन जगत होता.
हर्षवर्धन राणेनं स्पष्ट केलं की, जेव्हा ते घर सोडलं आणि स्वतःला सिद्ध करू लागले, त्यावेळी त्याला अत्यंत कठीण काळाचा सामना करावा लागलेला. आयएएनएसशी बोलताना हर्षवर्धन राणे म्हणाला की, "घर सोडल्यानंतर, पहिली गरज अन्न असते. अन्नासाठी पैसे लागतात आणि पैशासाठी नोकरी लागते, पण ती नोकरी शोधणं वाटतं तितकं सोपं नसतं. त्या काळात मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला."
त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देताना त्यांनी सांगितलं की, "जगण्यासाठी पुरेसे पैसे कमवण्यासाठी त्यांनी छोटी-मोठी कामं केली. अभिनेत्यानं आयएएनएसला सांगितलं की, "सुरुवातीला कोणीही मला काम देऊ केलं नाही. कोणीही करू शकणारं सर्वात सोपं काम म्हणजे, वेटर असणं. त्यासाठी कोणत्याही विशेष पात्रतेची आवश्यकता नव्हती. मला फक्त टेबलावर जेवण वाढायचं होतं. मी अशी नोकरी केली. मला दररोज फक्त 10 रुपये आणि 'छोले-चावल'ची एक प्लेट मिळायची. हा माझा सुरुवातीचा पगार होता आणि या कामानं मी स्वतःचा उदरनिर्वाह करू लागलो..."
View this post on Instagram
हर्षवर्धन राणेनं पुढे सांगितलं की, "यानंतर मी एका सायबर कॅफेमध्ये रजिस्टर अटेंडंट म्हणून काम केलं. माझं हस्ताक्षर चांगलं असल्यानं मला हे काम लवकर मिळू शकलं. मी एसटीडी बूथ आणि सायबर कॅफेमध्ये दिवसाला 10 ते 20 रुपये कमवत होतो. ही 2002 मधली गोष्ट आहे. दोन वर्षांनंतर, 2004 मध्ये, मी डिलिव्हरी बॉय झालो. मला एका बाईक शोरूममधून एका हॉटेलमध्ये हेल्मेट पोहोचवण्याचं काम देण्यात आलं. मी पोहोचलो, तेव्हा मला कळलं की, ते हेल्मेट जॉन अब्राहमसाठी आहे."
त्या क्षणाची आठवण करून देत हर्षवर्धन म्हणाला की, त्यावेळी मी खूप नर्वस झालेलो, घाबरलेलो. त्याला चूक होण्याची भीती वाटत होती. जॉनला हेल्मेट देताच त्यानं हर्षवर्धनचे आभार मानले. हर्षवर्धन म्हणाला की, "त्या दिवशी मला जाणवलं की, जर एखादा मोठा स्टार देखील डिलिव्हरी बॉयचे आभार मानू शकतो, तर त्यात मानवतेचा एक मोठा धडा लपलाय. जॉन अब्राहमसोबतची ही माझी पहिली भेट होती..."
कित्येक वर्षांनंतर हर्षवर्धनने जॉन अब्राहमनं प्रोड्यूस केलेल्या फिल्ममध्ये काम केलं. हा अनुभव त्याच्यासाठी खूपच खास होता. कारण, ती तिच व्यक्ती होती, ज्याला मी हेल्मेट दिलेलं. आता ती व्यक्ती मला सांगत होती, शिकवत होती, मार्गदर्शन करत होती. हर्षवर्धन म्हणाला की, आजही जेव्हा तो जॉनला पाहतो, तेव्हा त्याला अशीच भावना येते जणू 20 वर्षांपूर्वी त्याच्या हातात हेल्मेट आहे आणि जॉन त्याच्या समोर उभा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























