Hardeek Joshi : शेगांवची कचोरी, कोल्हापुरची झणझणीत मिसळ, राणादा फुड्सला यायलाच लागतंय, हार्दिक जोशीच्या पोस्टनं वेधलं लक्ष
Hardeek Joshi Post : अभिनेता हार्दीक जोशी याने एक नवी सुरुवात केली असून त्याने त्याच्या सोशल मीडियावरुन यासंदर्भात माहिती दिली.
Hardeek Joshi Post : अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) हा नुकताच 'जाऊ बाई गावात' (Jau Bai Gavat) या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' (Tuzyat Jeev Rangala) या मालिकेतून हार्दिक जोशी घराघरात पोहचला. कोल्हापुरचा हा राणादा प्रेक्षकांच्या बराच पसंतीस देखील उतरला. आता राणादा पुन्हा एकदा कोल्हापुरकरांच्या सेवेत आलाय. अभिनेता हार्दिक जोशी याने त्याच्या नव्या व्यवसायाची कोल्हापुरात सुरुवात केली.
राणादा फुड्स शेगाव कचोरी असं त्याच्या नव्या रेस्टॉरंटचं नाव आहे. कोल्हापुरातील राजारामपुरी येथे त्याचं हे नवं रेस्टॉरंट सुरु होणार आहे. शेगावची कचोरी, कोल्हापुरची झणझणीत मिसळ असे अनेक पदार्थाची चव इथे चाखायला मिळणार आहे. हार्दिकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिलीये.
हार्दिकच्या पोस्टनं वेधलं लक्ष
नमस्कार मंडळी... कोल्हापुरातील राजारामपुरी येथे माऊलीच्या पुतळ्याजवळ 'राणादा फुड्स'चं नवीन आउटलेट आम्ही सुरू करणार आहोत. या ठिकाणी खवय्यांना बदाम थंडाई, मिसळ आणि शेगाव ची सुप्रसिद्ध कचोरी या पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळेल. तर नक्की या! असा एक व्हिडिओ हार्दिकने त्याच्या सोशल मीडियावरुन शेअर केलाय.
'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat Jeev Rangala) या मालिकेतील हार्दिकनं साकारलेल्या राणादा या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. हार्दिकचा चाहता वर्ग मोठा आहे. तुझेच मी गीत गात आहे. या मालिकेमधून देखील तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. तसेच त्याचा लवकरच 'क्लब 52' (Club 52) हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे. हार्दिक जोशी, भरत ठाकूर, भाऊ कदम, शशांक शेंडे, यशश्री दसरी, टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके, संदीप गायकवाड अशी 'क्लब 52' या सिनेमाची तगडी स्टारकास्ट आहे. हार्दिकच्या आगामी मालिकांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. तसेच हार्दिकच्या 'जाऊ बाई गावात' या रिअॅलिटी गेम शोची देखील चर्चा सोशल मीडियावर होत आहे. त्याच प्रमाणे हार्दिक जोशीचा लॉकडाऊन लग्न हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram