एक्स्प्लोर

Kiran Mane Post : 'तुम्हाला या माणसाच्या या गोष्टींचीही तारीफ करता येत नसेल तर...' किरण मानेंची पुन्हा एकदा शरद पवारांवर स्तुतीसुमनं 

Kiran Mane Post : किरण माने यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर केलेल्या पोस्टची सध्या जोरदार चर्चा आहे. 

Kiran Mane Post : किरण माने (Kiran Mane) हे त्यांच्या पोस्टमुळे कायमच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर किरण माने यांनी पोस्ट केली होती. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावरही (Social Media) त्यांच्या या पोस्टची बरीच चर्चा होती. आता पुन्हा एकदा किरण माने यांच्या एका पोस्टनं साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. शरद पवारांवर केलेली ही पोस्ट देखील सध्या जोरदार चर्चेत आहे. 

शरद पवारांच्या एका सभेतील व्हिडिओ किरण माने यांनी शेअर केलाय. शरद पवारांच्या एका सभेत जनतेमधून एक कार्यकर्ता आवाज देतो, त्या कार्यकर्त्याचं नाव शरद पवार ओळखतात. त्याचाच हा व्हिडिओ आहे. या पोस्टमधून किरण माने यांनी विरोधकांवरही निशाणा साधलाय. 

किरण माने यांची पोस्ट नेमकी काय?

नुस्त्या आवाजावरनं पवारसाहेबांनी कार्यकर्त्याचं नांव ओळखलं ! ते अचूक निघालं !! काय अजब रसायन आहे राव हे... त्र्याऐंशी पेक्षा जास्त वय असलेल्या माणसाला जवळच्या नातेवाईकांची नांवं आठवत नाहीत गड्याहो... अद्भूत स्मरणशक्ती... अफलातून उत्साह... तुम्ही पवारविरोधक किंवा द्वेष्टे असा, तुम्हाला या माणसाच्या या गोष्टींचीही तारीफ करता येत नसेल तर तुमची जिंदगी झंड आहे. आयुष्य नफरतीने चडफडत काढणार तुम्ही, असं म्हणत किरण माने यांनी विरोधकांना देखील टोला लगावला आहे. 

त्यावर एक छोटेखानी पुस्तकच निघेल - किरण माने

माझ्या काॅन्ट्रोव्हर्सीच्या वेळी पवारसाहेबांनी मला भेटायला बोलावलंवतं, तेव्हा त्यांच्या केबीनमध्ये दीड तास त्यांनी माझ्याशी चर्चा केली. अनेक विषय निघाले. तिथे फक्त साहेब, मी आणि प्रतापराव आसबे, तिघेच होतो. त्या दीड तासांवर मी एक छोटेखानी पुस्तक लिहू शकेन... खरंतर तेव्हापास्नं बर्‍याचजणांचा गैरसमज आहे की मी सायबांचा माणूस आहे... लै हसतो मी अशा कमेन्टस् वाचल्यावर, असंही किरण माने यांनी म्हटलं आहे. 

 'माणूस' म्हणून त्यांचं वेगळेपण रेखाटलेलंच दिसेल - किरण माने

पुढे त्यांनी म्हटलं की,  'मला साहेबांविषयी आदर आहे तो अशा, या व्हिडीओत असलेल्या जगावेगळ्या गोष्टींमुळे. राजकारणी म्हणून मी अनेकदा टीकाही करतो. पण मी अभिनेता आहे. कुठलाही माणूस बारकाईनं बघतो. निरीक्षणातनं अंतर्बाह्य स्वभाव ओळखण्याचा छंद आहे मला. साहेबांना मी माझ्या लहानपणापास्नं बघतोय. त्यांच्या अनेक गोष्टींवर मी पोस्टस् लिहील्या आहेत. त्या सगळ्या पोस्टमध्ये 'माणूस' म्हणून त्यांचं वेगळेपण रेखाटलेलंच दिसेल तुम्हाला. कुठेही अंधभक्ती नाही दिसणार. अंधभक्त असतो तर त्यांच्या पक्षात प्रवेश केला नसता का मी? लव्ह हिम ऑर हेट हिम... पवारसाहेबांसारखा नेता यापूर्वी कधी झाला नाही, यापुढेही होणार नाही !'

View this post on Instagram
 
A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

ही बातमी वाचा : 

Tejaswini Pandit New Movie : तेजस्विनी पंडितचा 'येक नंबर' परिवार, महिला दिनानिमित्तान केली नव्या भूमिकेची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Meet Ajit Pawar : धनंजय मुंडे-अजितददा भेटीत फक्त नववर्षाच्या शुभेच्छा? भेटीत दडलंय काय?Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate | कोकाटे-भुजबळांमधली तू तू, मैं मैं कधी थांबवणार Special ReportThane Traffic | ट्रॅफिकचा त्रास ठाणेकरांनी आणखी किती वर्ष सोसायचं Special ReportSpecial Report PM Modi Mahal : पंतप्रधानांचा महल, सामनातून टीका, राजकारण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Embed widget