एक्स्प्लोर

Hardeek Joshi new Movie : 'काका मला वाचवा...' 'हार्दिक' जोशी घालतोय साद, याचं उत्तर लवकरच मिळणार 

Hardeek Joshi new Movie : सुमित संघमित्र दिग्दर्शित  'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटात अभिनेता हार्दीक जोशी हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Hardeek Joshi new Movie : छोटा पडदा गाजवलेला अभिनेता हार्दीक जोशी (Hardeek Joshi) या लवकरच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सुमित संघमित्र दिग्दर्शित  'लॉकडाऊन लग्न' (Lockdown Lagna) या चित्रपटात अभिनेता हार्दीक जोशी हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच या सिनेमा हार्दीक जोशी सोबत सुनील अभ्यंकर देखील पाहायला मिळणार आहे. या सिनेमाता हार्दीक जोशी आणि सुनील अभ्यंकर हे दोघेही काका पुतण्याच्या भूमिकेत दिसतील.

या चित्रपटाच्या निमित्ताने हार्दीक जोशी काका मला वाचवा अशी साद घालतोय, याचं उत्तर प्रेक्षकांना 8 मार्चला सिनेमागृहात मिळणार आहे. लॉकडाऊन लग्न हा सिनेमा येत्या 8 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अमोल कागणे प्रस्तुत "लॉकडाऊन लग्न" या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कागणे, अमोल कागणे, सागर पाठक यांनी केली आहे.सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अमोल गोळे यांनी चित्रपटाचं छायांकन केलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by HARDEEK JOSHI (Hardik joshi) (@hardeek_joshi)

अशी आहे सिनेमाची गोष्ट

चित्रपटाच्या नावातच लॉकडाऊन असल्यामुळे चित्रपटातून कोरोना काळातली गोष्ट दाखवली जाणार असल्याचं स्पष्ट होतं. त्याशिवाय लग्नाशी संबंधित विषय असल्यानं काहीतरी मजेदार पहायला मिळणार यात शंका नाही.हार्दिक जोशी आणि सुनील अभ्यंकर हे दोघंही कसलेले अभिनेते आहेत. काका-पुतण्याच्या भूमिकेत असलेल्या या दोघांनी या चित्रपटात धमाल उडवून दिली आहे. काका पुतण्यासाठी काय करतो? हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  त्यामुळे हार्दिक जोशी  'काका मला वाचवा' अशी साद सुनील अभ्यंकर यांना का घालत आहे, याचं उत्तर मिळण्यासाठी थोडेच दिवस थांबावं लागणार आहे.  

हार्दीक जोशीने शेअर केली पोस्ट 

काही दिवसांपूर्वी हार्दीक जोशीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत त्याच्या या आगामी सिनेमाविषयी माहिती दिली आहे. तसेच त्याच्या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावर करत उत्सुकता देखील दाखवली आहे. त्यामुळे हार्दीकचा हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

ही बातमी वाचा : 

Prajakta Mali : प्राजक्ता माळी पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार, 'या' चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका, पुण्यात लवकरच चित्रीकरण होणार सुरु

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फुकट्या रेल्वे प्रवाशाचा टीसीसह कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, कंत्राटी कर्मचाऱ्याने जीव गमावला, दोघे जखमी
फुकट्या रेल्वे प्रवाशाचा टीसीसह कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, कंत्राटी कर्मचाऱ्याने जीव गमावला, दोघे जखमी
MPSC च्या लिपिक टंकलेखक पदांसाठीची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर, 155 उमेदवारांची नावे जाहीर
MPSC च्या लिपिक टंकलेखक पदांसाठीची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर, 155 उमेदवारांची नावे जाहीर
ICC Ranking : सूर्यादादाचा दबदबा कायम, अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्याचा जलवा, गोलंदाजीत अक्षर आघाडीवर 
ICC Ranking : सूर्यादादाचा दबदबा कायम, अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्याचा जलवा, गोलंदाजीत अक्षर आघाडीवर 
सामना पावसामुळे रद्द, हैदराबादचा प्लेऑफमध्ये प्रवेश, दिल्ली-लखनौचं आव्हान संपलं
सामना पावसामुळे रद्द, हैदराबादचा प्लेऑफमध्ये प्रवेश, दिल्ली-लखनौचं आव्हान संपलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amol Mitkari on Ajit Pawar : अजितदादा सक्तीच्या विश्रांतीवर, अमोल मिटकरी काय म्हणाले? ABP MajhaMumbai Clean Up Marshal : मुंबईमध्ये क्लीन अप मार्शलच्या नावावर लूट, 'एबीपी माझा'ने रंगेहाथ पकडलंKolhapur Hoardings Action : कोल्हापुरात पालिकेला आली जाग, 25 अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाईUddhav Thackeray On Raj Thackeray : राज ठाकरे यांच्याबाबत प्रश्न, उद्धव ठाकरेंनी बोलणं टाळलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फुकट्या रेल्वे प्रवाशाचा टीसीसह कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, कंत्राटी कर्मचाऱ्याने जीव गमावला, दोघे जखमी
फुकट्या रेल्वे प्रवाशाचा टीसीसह कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, कंत्राटी कर्मचाऱ्याने जीव गमावला, दोघे जखमी
MPSC च्या लिपिक टंकलेखक पदांसाठीची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर, 155 उमेदवारांची नावे जाहीर
MPSC च्या लिपिक टंकलेखक पदांसाठीची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर, 155 उमेदवारांची नावे जाहीर
ICC Ranking : सूर्यादादाचा दबदबा कायम, अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्याचा जलवा, गोलंदाजीत अक्षर आघाडीवर 
ICC Ranking : सूर्यादादाचा दबदबा कायम, अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्याचा जलवा, गोलंदाजीत अक्षर आघाडीवर 
सामना पावसामुळे रद्द, हैदराबादचा प्लेऑफमध्ये प्रवेश, दिल्ली-लखनौचं आव्हान संपलं
सामना पावसामुळे रद्द, हैदराबादचा प्लेऑफमध्ये प्रवेश, दिल्ली-लखनौचं आव्हान संपलं
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! 17 मे ते 2 जूनदरम्यान विशेष ब्लॉक, काही गाड्या रद्द
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! 17 मे ते 2 जूनदरम्यान विशेष ब्लॉक, काही गाड्या रद्द
CSK vs RCB : आरसीबीसाठी करो या मरो, चेन्नईबरोबर फायनलसाराखा सामना
CSK vs RCB : आरसीबीसाठी करो या मरो, चेन्नईबरोबर फायनलसाराखा सामना
माता न तूं वैरिणी! आईच्या संमतीने नराधमाकडून सातवीतील मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वडिलांचीही साथ
आईच्या संमतीने नराधमाकडून सातवीतील मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वडिलांचीही साथ; न्यायालयाकडून मिळाला न्याय
डोळ्यात पाणी... अवकाळीने गावकरी त्रस्त, प्रशासन मतदानात व्यस्त; पालघरमध्ये शेकडो कुटुंब उघड्यावर
डोळ्यात पाणी... अवकाळीने गावकरी त्रस्त, प्रशासन मतदानात व्यस्त; पालघरमध्ये शेकडो कुटुंब उघड्यावर
Embed widget