एक्स्प्लोर

Happy Birthday Ananya Panday : वयाच्या 24 व्या वर्षी अनन्या पांडे आहे कोट्यावधींची मालकीण; एका सिनेमासाठी घेते 'इतकी' फी

Happy Birthday Ananya Panday : प्रसिद्ध चित्रपट अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आज तिचा 24 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Happy Birthday Ananya Panday : 'स्टुडंट ऑफ द इयर 2' (Student Of The Year 2) चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा (Ananya Panday) आज 24 वा वाढदिवस साजरा करत आहे. अनन्याने अगदी कमी कालावधीत इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळक निर्माण केली. अनन्या तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. अनन्या पांडेला अभिनयाचा वारसा तिच्या वडिलांकडून मिळाला आहे. तिचे वडील 'चंकी पांडे' हे देखील उत्तम अभिनेते आहेत. अनन्या पांडेची गणना बॉलिवूडमधील श्रीमंत अभिनेत्रींमध्ये केली जाते. आज अनन्याच्या वाढदिवसानिमित्त तिच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊयात.  

अनन्याच्या करिअरची सुरुवात स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून झाली. त्यानंतर ती 'पती पत्नी और वो', ईशान खट्टरसोबत 'खाली पीली'मध्ये दिसली होती. 2022 मध्ये अनन्याने गेहराईया आणि लायगर यांसारखे चित्रपट दिले. लायगर या चित्रपटातून अनन्या साऊथ सुपरस्टार  विजय देवरकोंडासोबत दिसली होती. या चित्रपटातून अनन्याने साऊथमध्येदेखील पदार्पण केले.

चित्रपट आणि जाहिरातींतून कमाई 

अनन्या पांडे प्रामुख्याने तिच्या चित्रपट आणि जाहिरातींतून कमाई करते. मिळालेल्या माहितीनुसार, अनन्या तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी दोन कोटींची फी घेते. यासोबतच ती ब्रॅंडच्या जाहिरातीसाठी लाखो रुपये घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनन्या पांडेची एकूण संपत्ती 30 कोटींहून अधिक आहे.  

आलिशान घर 

अनन्या पांडेचे स्वतःचे आलिशान घर आहे. मुंबईतील पाली हिल येथील एका घरात ती आपल्या कुटुंबियांसह राहते. तिने आपल्या घरात आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश केला आहे. त्यांच्या घराची किंमत कोटींमध्ये असल्याचे सांगितले जाते.

लक्झरी गाड्यांचे कलेक्शन 

अनन्या पांडेला लक्झरी कारचीही खूप आवड आहे. रिपोर्ट्सनुसार, तिच्या कार कलेक्शनमध्ये 88.24 लाख किमतीची 'रेंज रोव्हर स्पोर्ट', 63.30 लाखांची 'मर्सिडीज-बेंझ ई-क्लास', 33 लाख किंमतीची 'स्कोडा कोडियाक' आणि इतर अनेक कारचा समावेश आहे. 

इन्स्टाग्रामवरही सक्रिय 

अनन्या पांडेचे इन्स्टाग्रामवर 24 मिलीयन फॉलोअर्स आहेत. अनन्या अनेकदा इन्स्टाग्रामवर अनेकदा बोल्ड आणि सिझलिंग फोटो शेअर करत असते. वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, अनन्या पुढे सिद्धांत चतुर्वेदीबरोबर 'खो गए हम कहाँ' मध्ये दिसणार आहे. याशिवाय ही अभिनेत्री आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल 2 मध्येदेखील दिसणार आहे.   

महत्वाच्या बातम्या : 

Harish Kalyan Wedding : शाही थाट, शोभून दिसतोय जोडा खास; साऊथ सुपरस्टार अडकला लग्नाच्या बेडीत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget