एक्स्प्लोर

Happy Birthday Allu Arjun : ‘पुष्पा’च नाही तर ‘या’ चित्रपटांमध्येही दिसलाय अल्लू अर्जुनचा रावडी अंदाज! तुम्ही पाहिलेयत का?

Allu Arjun Birthday : आज म्हणजेच 8 एप्रिल 2022 रोजी अल्लू अर्जुन त्याचा 40वा वाढदिवस साजरा करत आहे.

Allu Arjun Birthday : अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा टॉलीवूड इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे. अभिनयासोबतच त्याच्या स्टाईलचे लाखो चाहत्यांना वेड लावले आहे. आज म्हणजेच 8 एप्रिल 2022 रोजी अल्लू अर्जुन त्याचा 40वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त, त्याच्या गाजलेल्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊ, ज्यांनी अल्लू अर्जुनला खूप प्रसिद्धी मिळवून दिली.

रेस गुर्रम

अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘रेस गुर्रम’ हा एक अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका सामान्य मुलाची कथा आहे, ज्याचे आयुष्य अचानक बदलून जाते, जेव्हा एक धोकादायक गुन्हेगार शिव रेड्डी त्याच्या आयुष्यात येतो. प्रेक्षक हा चित्रपट यूट्यूबवर पाहू शकतात.

सराईनोडू

2016मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अल्लू अर्जुनने एका माजी सैनिकाची भूमिका केली होती, जो भ्रष्टाचारी आणि अन्याय करणाऱ्यांना शिक्षा करतो. चित्रपटातील अभिनेत्याच्या दमदार अ‍ॅक्शनसोबतच, त्याची रोमँटिक शैलीही प्रेक्षकांना पाहायला मिळाली. चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने जगभरात 127 कोटींचा व्यवसाय केला. प्रेक्षक हा चित्रपट जिओ सिनेमावर पाहू शकतात.

वैकुंठपुरमलो

2020मध्ये आलेला आलेला ‘वैकुंठपुरमलो’ हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात अभिनेत्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडेही झळकली होती. चित्रपटातील अल्लूच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलायचे, तर अभिनेता यात बंटू नावाच्या एका व्यक्तीची भूमिका करतोय, जो त्याच्या वडिलांना शोधण्यासाठी निघतो आणि नंतर त्याच्या कुटुंबाला त्रास देणाऱ्या माणसापासून वाचवतो.

डीजे (दुव्वाद जगन्नाथ)

अभिनेता अल्लू अर्जुनचा आणखी एक चांगला चित्रपट म्हणजे ‘डीजे’ (दुव्वाद जगन्नाथ). हा चित्रपट 2017मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाची कथा एका व्यक्तीभोवती फिरते, जो लग्न आणि समारंभासाठी स्वयंपाकी म्हणून काम करतो. पण, आपल्या रागीट शैलीने तो अनेक गुन्हेगारांना त्यांच्या कृत्याची शिक्षाही देतो. विशेष म्हणजे गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे काम तो घरातील सदस्यांपासून लपून करतो.

पुष्पा : द राईज

या चित्रपटातील अभिनेत्याच्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. या चित्रपटातील अल्लू अर्जुनची व्यक्तिरेखा त्याने आजवर साकारलेल्या सर्व पात्रांपेक्षा खूपच वेगळी होती. ‘पुष्पा’मध्ये अल्लू अर्जुनचा एका मजुरापासून ते तस्करी किंग बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवला होता. या चित्रपटातील अभिनेत्याची रफ अँड टफ भूमिका लोकांना खूप आवडली.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
Janhavi Kapoor:‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Embed widget