एक्स्प्लोर

मॉडेलसमोर रस्त्यावर तरुणाचं हस्तमैथून, कॅबसाठी वाट पाहताना प्रताप, अभिनेत्रीची तात्काळ पोलिसात धाव

Gurugram Crime : मॉडेलसमोर रस्त्यावर तरुणाचं हस्तमैथून, कॅबसाठी वाट पाहताना प्रताप, अभिनेत्रीची तात्काळ पोलिसात धाव

Gurugram Crime : गुरुग्राममधून एक अत्यंत लाजीरवाणा प्रकार समोर आला आहे. मॉडेल असलेल्या तरुणीसमोर तरुणाने रस्त्यावर हस्तमैथून केल्याचा प्रकार समोर आलाय. मॉडेल कॅबसाठी वाट पाहात असताना तिच्यासमोर तरुणाने अश्लील वर्तन आहे. या तरुणीने हे संपूर्ण प्रकरण आपल्या मोबाईलमध्ये शूट केलं आणि सोशल मीडियावर पोस्ट करून पोलिसांकडून कारवाईची मागणी केली आहे. ही घटना गुरुग्राममधील सर्वात वर्दळीच्या राजीव चौक परिसरात घडली. कॅबची वाट पाहत असलेल्या मॉडेलकडे पाहून एका तरुणाने अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्या तरुणीने हे दुर्लक्षित केलं, पण जेव्हा त्याचं वर्तन अती होत गेलं, तेव्हा तिने त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आणि त्या तरुणाविरोधात पोलिसांत कारवाईची मागणी केली.

खरंतर ती तरुणी एका कामासाठी गुरुग्रामहून जयपूरला गेली होती. 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 च्या सुमारास ती बसने दिल्ली-जयपूर हायवेवरील राजीव चौक, गुरुग्राम येथे पोहोचली. तिथून ती घराकडे जाण्यासाठी कॅबची वाट पाहत होती. त्याच दरम्यान तिने एका तरुणाला तिच्याकडे पाहून अश्लील चाळे करताना पाहिलं. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण जेव्हा त्याचं वर्तन खूप घाणेरडं झालं, तेव्हा तिला त्याचा व्हिडिओ काढावा लागला. त्या तरुणाने चेहऱ्यावर मास्क घातलेला होता. त्याने खांद्यावरून पुढे लटकवलेली बॅग घेतली होती आणि पँटची चैन उघडून तिच्यासमोर अश्लील चाळे करत होता.

व्हायरल व्हिडिओमध्ये ती तरुणी म्हणते की, तो तरुण तिच्या आजूबाजूला बऱ्याच वेळेपासून घुटमळत होता. हे पाहून तिचा प्रचंड राग आला असल्याचं तरुणीने पोस्टमध्ये म्हटलंय. तिने अनेक वेळा कॅब ड्रायव्हरला कॉल केला पण त्याने फोन उचलला नाही. त्या घाणेरड्या वागणुकीपासून बचाव करण्यासाठी तिने दुसरी कॅब बुक केली आणि तिथून घरी निघून गेली. घरी पोहोचल्यावर तिने तो व्हिडिओ गुरुग्राम पोलीस, सरकारी खात्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स आणि महिला हेल्पलाइनच्या X (पूर्वी ट्विटर) अकाउंटवर शेअर केला. मात्र, कुठूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तिने महिला हेल्पलाइन क्रमांक 1090 वर सुद्धा कॉल केला, पण कॉल कनेक्ट झाला नाही.

ऑनलाईन तक्रार घेतली नाही, मॉडेलने व्यक्त केला संताप 

जेव्हा तिने पोलिसांत तक्रार नोंदवली, तेव्हा तिने सांगितलं की सकाळी 11 वाजता राजीव चौक येथे तिच्यासोबत ही घटना घडली आहे आणि त्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. पण ऑनलाईन तक्रार घेण्याऐवजी तिला सांगण्यात आलं की तिने थेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी. या प्रकरणी तिने सोशल मीडियावर लिहिलं की तिच्यासोबत मोठा अनर्थ घडला असता, तर काय झालं असतं? तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष जायचं का? अशा प्रकारच्या तक्रारी ऑनलाइन का नोंदवता येत नाहीत? तिने म्हटलं की गुरुग्राम पोलीस ऑनलाईन तक्रारी घेत नाहीत, हे ऐकून तिला खूप वाईट वाटलं.
या प्रकरणावर पोलीस संदीप कुमार यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की पोलिसांच्या निदर्शनास ही घटना आली असून लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि आरोपीची ओळख पटवून त्याला अटक करण्यात येईल.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

धनुषसोबत रिलेशनशिपच्या चर्चा, आता अभिनेत्री मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा, म्हणाली...

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk On Salman Khan: 'सोनम इट्स डन ब्रो...' म्हणत उपोषण सोडायला सांगणाऱ्या सलमान खानला सोनम वांगचूक यांनी सुनावलं, म्हणाले...
'सोनम इट्स डन ब्रो...' म्हणत उपोषण सोडायला सांगणाऱ्या सलमान खानला सोनम वांगचूक यांनी सुनावलं, म्हणाले...
शाळेतील मुलांना 'खान' अन् 'पुष्पा' हिरो वाटतात, त्यांनी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडेचं नावही ऐकलेलं नाही; समीर वानखेडेंची खंत, व्यथित होऊन म्हणाले...
शाळेतील मुलांना 'खान' अन् 'पुष्पा' हिरो वाटतात, त्यांनी तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडेचं नावही ऐकलेलं नाही; समीर वानखेडेंची खंत, व्यथित होऊन म्हणाले...
Samay Raina Bihari Joke Row: समय रैना 'इंडियाज गॉट लेटंट 2' मध्ये शेरॉनला म्हणाला, 'तुम्ही बिहारी नोकरीसाठी मुंबईत येता...'; मनोज वाजपेयी संतापून म्हणाले...
समय रैना 'इंडियाज गॉट लेटंट 2' मध्ये शेरॉनला म्हणाला, 'तुम्ही बिहारी नोकरीसाठी मुंबईत येता...'; मनोज वाजपेयी संतापून म्हणाले...
KBC 18, Pragati Kalpekar: चहा विकणाऱ्या बापाची लेक, कुटुंबाचा संघर्ष, डॉक्टर बनण्याचं स्वप्न भंगल्याची खंत आणि आता IFS अधिकारी बनण्याची महत्त्वाकांक्षा, KBC 18 मध्ये 'हॉट सीट'पर्यंत पोहोचलेली अमरावतीची प्रगती कल्पेकर कोण?
चहा विकणाऱ्या बापाची लेक, कुटुंबाचा मोठा संघर्ष; अमरावतीची प्रगती कल्पेकरनं KBC मध्ये एक उत्तर चुकीचं दिलं अन् 6 लाख गमावले...

व्हिडीओ

Nepal Flood Viral House Video: नेपाळमधील महापुरात भक्कम असलेल्या घराची Inside Story
Mohan Bhagwat on Muslim Statment : भारतात एकही मुस्लीम नको म्हणणारा हिंदू नाही Special Report
Nepal flood : घर असावं तर असं! नेपाल महापुरातही सुरक्षित Special Report
Sangli Ganpati Lezim : बाप्पाच्या स्वागताला लेझीमचा ताल, परंपरेचा ठेका | Special Report ABP Majha
Sanjay jadhav Speech Parbhani : मनोज जरांगेंवर भाष्य, माझ्यावर बोलायचा तुमचा नैतिक अधिकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drishyam 3 Cast Fees Ajay Devgn: 'दृश्यम 3'ची स्टारकास्ट मालामाल, अजय देवगणची फी कोटींच्या घरात, तर तब्बू, इशिता दत्ता आणि श्रिया सरन यांनी किती पैसे घेतले?
'दृश्यम 3'ची स्टारकास्ट मालामाल, अजय देवगणची फी कोटींच्या घरात, तर तब्बू, इशिता दत्ता आणि श्रिया सरन यांनी किती पैसे घेतले?
Iran War Live Update: एका महिन्यानंतर अमेरिकेचा इराणवर पुन्हा हल्ला, होर्मुझजवळील रॉकेट लाँचर लक्ष्य; प्रत्युत्तरात इराणने जॉर्डनवर मिसाईल डागल्या
एका महिन्यानंतर अमेरिकेचा इराणवर पुन्हा हल्ला, होर्मुझजवळील रॉकेट लाँचर लक्ष्य; प्रत्युत्तरात इराणने जॉर्डनवर मिसाईल डागल्या
Rahul Gandhi: ज्या हल्द्वानीत शुद्धीकरणानंतर राहुल गांधींनी FIR ची मागणी केली तिथंच आता त्यांच्याविरोधात FIR दाखल! SC/ST कायद्यानुसार कलमे लावली
ज्या हल्द्वानीत शुद्धीकरणानंतर राहुल गांधींनी FIR ची मागणी केली तिथंच आता त्यांच्याविरोधात FIR दाखल! SC/ST कायद्यानुसार कलमे लावली
Abhijeet Dipke on RSS Mohan Bhagwat: भाजपला ते RSS पेक्षाही मोठे असल्याचं वाटू लागलंय, पंतप्रधान मोदी मोहन भागवतांचं ऐकत नाहीत: अभिजीत दिपके
भाजपला ते RSS पेक्षाही मोठे असल्याचं वाटू लागलंय, पंतप्रधान मोदी मोहन भागवतांचं ऐकत नाहीत: अभिजीत दिपके
NEET Exam: 'नीट'मध्ये 680 गुणांचा दावा, प्रत्यक्षात 160 गुण; विद्यार्थिनीला हायकोर्टाचा 25 हजारांचा दंड, नेमकं काय घडलं?
'नीट'मध्ये 680 गुणांचा दावा, प्रत्यक्षात 160 गुण; विद्यार्थिनीला हायकोर्टाचा 25 हजारांचा दंड, नेमकं काय घडलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime News: मामेभावांनीच ठेचले आतेभावाचे डोके; जुन्या आर्थिक वादाचा रक्तरंजित शेवट, छत्रपती संभाजीनगरमधील थरारक घटना
मामेभावांनीच ठेचले आतेभावाचे डोके; जुन्या आर्थिक वादाचा रक्तरंजित शेवट, छत्रपती संभाजीनगरमधील थरारक घटना
Auqib Nabi News : भारतासाठी डेब्यूचं स्वप्न अधुरं राहिलं, आता इंग्लंडमध्ये खेळणार आकिब नबी; श्रीलंका दौऱ्यावर होता टीम इंडियासोबत
भारतासाठी डेब्यूचं स्वप्न अधुरं राहिलं, आता इंग्लंडमध्ये खेळणार आकिब नबी; श्रीलंका दौऱ्यावर होता टीम इंडियासोबत
Mumbai Bank Election: भाजपच्या दरेकर-प्रसाद लाडांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची एन्ट्री, मुंबै बँकेच्या निवडणुकीत पॅनल उतरवणार, सहकार क्षेत्रात फडणवीस-शिंदे सामना रंगणार?
भाजपच्या दरेकर-प्रसाद लाडांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची एन्ट्री, मुंबै बँकेच्या निवडणुकीत पॅनल उतरवणार, सहकार क्षेत्रात फडणवीस-शिंदे सामना रंगणार?
Embed widget