धनुषसोबत रिलेशनशिपच्या चर्चा, आता अभिनेत्री मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा, म्हणाली...
Mrunal Thakur on Dhanush : अभिनेत्री मृणाल ठाकूर साऊथ स्टार धनुषला डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. याबाबत मृणाला ठाकूरने खुलासा केलाय.

Mrunal Thakur on Dhanush : साऊथ स्टार धनुष आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. मृणालचा एक जुना मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे, ज्यामध्ये तिने "नजर लागणे" यावर विश्वास असल्याचं सांगितलं आहे. तसेच, तिने असंही सांगितलं की एखाद्याने स्वतःबद्दल बोलण्याआधी दोनदा विचार केला पाहिजे. अलीकडेच धनुष आणि मृणाल ठाकूर यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. 1 ऑगस्टला मृणालच्या वाढदिवसाला धनुषने लावलेल्या उपस्थितीमुळे या चर्चांना सुरुवात झाली. त्यानंतर तिने अलीकडेच केलेल्या “सन ऑफ सरदार 2” चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला धनुष हजर होता, त्यामुळे या चर्चांना अधिक उधाण आलं.
मृणाल ठाकूरने डेटिंगच्या चर्चांवर मौन सोडलं
Instant Bollywood सोबत संवाद साधताना मृणाल ठाकूर म्हणाली की, “माझ्या करिअरमध्ये अजून खूप काही करायचं आहे. अजून अनेक गोष्टी अपूर्ण आहेत. त्या गोष्टी पूर्ण झाल्यावरच मी त्यांच्याबद्दल बोलेन. नजर लागते असं म्हणतात, त्यावर माझा विश्वास आहे. ‘खूप नजर लागते’.” त्यामुळे स्वतःबद्दल बोलताना काळजी घेणं गरजेचं असतं,
तिने असंही सांगितलं की, “स्वतःबद्दल बोलण्याआधी विचार करावा लागतो. आपण जगाला किती माहिती सांगतो यावर नियंत्रण हवं. कधी कधी आपण जे बोलतो. जे आपण करणार आहोत किंवा करतो आहोत ते ऐकून ते काम अडतं, वाईट होतं. माझी व्यक्तिमत्त्वही थोडी वेगळी आहे. काही लोक त्यांच्या पुढच्या वर्षी येणाऱ्या चित्रपटांची यादी सांगतात, पण मला असं काही करायचं वाटत नाही. कोणते चित्रपट येणार आहेत, कोणते नाही, हे सगळ्यांना माहित असतं. मला सतत माझ्या आयुष्यात काय घडतंय याचा विचार करणं आणि त्याबद्दल बोलणं आवडत नाही.”
मृणालने असंही उघड केलं की, “लोक मला विचारतात की, कामाचा ताण कसा हाताळतेस? पण मला असं काही वाटत नाही. मी खूप पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत नाही. चित्रपट रिलीज होण्याआधी मी तणावातही राहत नाही.”
मग धनुष आणि मृणाल ठाकूर खरंच डेट करतायत का?
“सन ऑफ सरदार 2” या मृणाल ठाकूर आणि अजय देवगण यांच्या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान धनुष उपस्थित होता, आणि त्या कार्यक्रमात मृणाल आणि धनुष यांच्यातील संवादाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या क्लिपमध्ये दोघंही एकमेकांशी मोकळ्या मनाने बोलताना दिसतात. याआधी जुलै महिन्यात मृणाल ठाकूरने लेखक-निर्माता कनिका ढिल्लनने आयोजित केलेल्या एका पार्टीला हजेरी लावली होती. ही पार्टी धनुषच्या आगामी चित्रपट “तेरे इश्क में” साठी होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद एल. राय करत असून, त्यात कृति सॅनॉन सुद्धा प्रमुख भूमिकेत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























