Govinda Wife Sunita Ahuja Reacts On Divorce Rumours: 'तू ज्यादा बोल रहा है बेटा...'; गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर प्रश्न, सुनीता अहुजा संतापली, नको नको ते बोलली!
Govinda Wife Sunita Ahuja Reacts On Divorce Rumours: काहीही चर्चा सुरू असल्या तरी मला कसलाही फरक पडत नाही, असं सुनीता अहुजानं म्हटलं आहे. तसेच, तिनं घटस्फोटावर प्रश्न विचारणाऱ्या पॅपाराझींना फटकारलंही आहे.

Govinda Wife Sunita Ahuja Reacts On Divorce Rumours: बॉलिवूड सुपरस्टार (Bollywood Superstar) गोविंदा (Govinda) सध्या त्याच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे (Divorce Rumors) चर्चेत आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा (Sunita Ahuja) लवकरच एकमेकांपासून विभक्त होणार असल्याच्या चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. दोघांनाही याबाबत सातत्यानं विचारणा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता मीडियाशी बोलताना सुनीता अहुजानं घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. काहीही चर्चा सुरू असल्या तरी मला कसलाही फरक पडत नाही, असं सुनीता अहुजानं म्हटलं आहे. तसेच, तिनं घटस्फोटावर प्रश्न विचारणाऱ्या पॅपाराझींना फटकारलंही आहे.
काही महिन्यांपूर्वी गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या बातमीनं खळबळ उडाली होती. सुनीतानं गोविंदापासून घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केल्याचंही सांगण्यात आलं. यानंतर, गोविंदा आणि सुनीता यांच्या टीमने घटस्फोटाच्या वृत्ताचं खंडन केलं होतं. पण, सुनीता आणि गोविंदा एकाच घरात एकत्र राहत नाहीत, तर वेगवेगळ्या घरात राहतात, अशी माहिती समोर आल्यानंतर घटस्फोटाच्या चर्चांना आणखी उधाण आलं. तेव्हापासून सुनीता अहुजा जिथे कुठे स्पॉट होईल, तिथे तिला गोविंदाबद्दल प्रश्न विचारले जातात. यावेळीही तिला गोविंदासोबतच्या घटस्फोटाबाबत प्रश्न विचारण्यात आला. अशातच आता तिनं घटस्फोटाच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, सारखं प्रश्न विचारणाऱ्यांना फटकारलं आहे.
"जब तक हम नहीं मुंह खोलें, बाद में गोले ही गोले..."
घटस्फोटाच्या अफवांबद्दल सुनीता आहुजाला विचारण्यात आलं, त्यावेळी तिनं इन्स्टंट बॉलिवूडला सांगितलं की, "तू ज्यादा बोल रहा है बेटा... कोणत्याही बातम्या आल्या तरी मला काही फरक पडत नाही. मी तुम्हाला आधीही सांगितलंय आणि आताही सांगतेय की, जोपर्यंत तू आमच्याकडून ऐकत नाहीस, तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवू नकोस. कोणत्याही बातम्यांवर प्रतिक्रिया देऊ नकोस... जब तक हम नहीं मुंह खोलें, बाद में गोले ही गोले..."
View this post on Instagram
गोविंदाबद्दल विचारल्यावर लीप सीलचा इशारा
सुनीता आहुजा हिनं अलिकडेच एका फॅशन वीकमध्ये तिचा मुलगा यशवर्धन आहुजासोबत रॅम्प वॉक केलेला. दोघांचे फोटो आणि रॅम्पवॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण या काळात गोविंदा त्याच्यासोबत कुठेही दिसला नाही. जेव्हा सुनीताला गोविंदाबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा ती तिथून मध्येच निघून गेली आणि हातानं इशारा केला की, ती काहीही बोलणार नाही. सुनीतानं लीप सीलचा इशारा केला.
गोविंदा-सुनीता यांच्या घटस्फोटाच्या अफवा
दरम्यान, सुनीता अहुजानं 'हिंदी रश'ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की, ती (सुनीता आहुजा) आणि गोविंदा गेल्या 12 वर्षांपासून वेगवेगळ्या घरात राहत आहेत. ती मुलांसोबत राहते, तर गोविंदा दुसऱ्या घरात एकटाच राहतो. ती तिचा वाढदिवस एकटीच साजरा करते. त्यानंतर गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























