Arbaaz Khan Second Wife Sshura Khan Is Pregnant: भाईजानच्या घरात चिमुकला पाहुणा येणार; 57 वर्षांचा अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा होणार?
Arbaaz Khan Second Wife Sshura Khan Is Pregnant: अरबाज खान आणि शूरा खानच्या व्हायरल व्हिडीओमध्ये, शूरा खाननं तिचा बेबी बंप कव्हर होईल, असे आऊटफिट्स वेअर केल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेऱ्यापासून ती आपला बेबी बंप लपवत होती.

Arbaaz Khan Second Wife Sshura Khan Is Pregnant: बॉलिवूड अभिनेता अरबाज खानला (Arbaaz Khan) अलीकडेच त्याची पत्नी शूरा खानसोबत एका गायनॅक्लॉजिस्टच्या क्लिनिकबाहेर पाहिलं गेलं. शूरा आणि अरबाजचा हाच व्हिडीओ पिंकव्हिलाच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. तसेच, या पोस्टमध्ये शूरा खान प्रेग्नंट असल्याचा दावा करण्यात आला आहे. अरबाज आणि शूराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वयाच्या 55 व्या वर्षी, अरबाज खाननं डिसेंबर 2023 मध्ये सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी (Sshura Khan) दुसरं लग्न केलं. दरम्यान, अरबाज दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्याची पहिली पत्नी मलायका अरोरापासून अरबाजला एक मुलगा आहे.
अरबाज खान आणि शूरा खानच्या व्हायरल व्हिडीओमध्ये, शूरा खाननं तिचा बेबी बंप कव्हर होईल, असे आऊटफिट्स वेअर केल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेऱ्यापासून ती आपला बेबी बंप लपवत होती. पण, एवढे प्रयत्न केल्यानंतरही ती बेबी बंपसह कॅमेऱ्यात कैद झाली. पिंकव्हिलानं शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून चाहते अरबाज आणि शूरा दोघांचं अभिनंदन करत आहेत. पण, अद्याप अरबाज खान किंवा खान कुटुंबातील इतर कुणीही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी खान कुटुंबानं आयोजित केलेल्या 'ईद पार्टी' दरम्यान, शूरा प्रेग्नंट असल्याची चर्चा रंगली होती. पण, तिच्या व्हायरल व्हिडीओनं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
View this post on Instagram
खान कुटुंबात चिमुकल्या पावलांनी नवा पाहुणा येणार
अरबाजनं वयाच्या 31 व्या वर्षी मलायका अरोराशी लग्न केलं. त्यानंतर 27 वर्षांच्या सुखी संसारानंतर दोघांनीही एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आज त्यांचा मुलगा आराहान खान 23 वर्षांचा आहे. मलायकापासून वेगळं झाल्यानंतर, अरबाजनं 2023 मध्ये लग्न केलं आणि आता वयाच्या 57 व्या वर्षी तो पुन्हा एकदा वडील होणार आहे. अरबाजसोबत सलमान खानचे चाहतेही या बातमीने आनंदी दिसत आहेत. 14 एप्रिल रोजी पुन्हा एकदा मिळालेल्या धमकीमुळे भाईजानच्या चाहत्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता, पण आता सलमान पुन्हा एकदा काका होणार आहे, ही बातमी ऐकून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























