Govinda Sunita Ahuja Divorce Rumors: "पुरुषांवर विश्वास ठेवू नका, पुढच्या जन्मी गोविंदा मला नवरा म्हणून नको"; घटस्फोटाच्या चर्चेनंतर सुनीता अहुजांचं वक्तव्य Viral
Govinda Sunita Ahuja Divorce Rumors: गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजाच्या घटस्फोटाचं कारण 30 वर्षांची एक मराठी अभिनेत्री असल्याच्याही जोरदार चर्चा सुरू आहेत.

Govinda Sunita Ahuja Divorce Rumors: गोविंदा (Govinda) आणि पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) यांचं लग्न सुमारे 37 वर्षांपूर्वी झालं होतं. आता दोघांच्या नात्यात मिठाचा खडा पडला असून लवकरच दोघांचा घटस्फोट होणार असल्याचं बोललं जात आहे. दोघांच्या घटस्फोटाचं कारण 30 वर्षांची एक मराठी अभिनेत्री असल्याच्याही जोरदार चर्चा सुरू आहेत. अद्याप या अभिनेत्रीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच, दोघांकडूनही अद्याप या चर्चांवर कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
सुनीता आहुजा आणि गोविंदा यांच्याबद्दल चर्चा सुरू आहेत. अशातच आता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा यांचं एक जुनं वक्तव्य जोरदार चर्चेत आहे. सुनीता अहुजा यांचं हे वक्तव्य ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पुरूषांवर जास्त विश्वास ठेवू नका : सुनीता अहुजा
सुनीता आहुजा यांचं एक वक्तव्य चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना सुनीता अहुजा यांनी पुरुषांबबात वक्तव्य केलं आहे. गोविंदा म्हणाला की, पुरुषांवर जास्त विश्वास ठेवू नका. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सुनीता आहुजा यांनी यावेळी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्या म्हणाल्या की, "गोविंदाच्या निष्ठेबद्दल मला नेहमीच असुरक्षित वाटतं, पुढच्या जन्मात गोविंदा माझा नवरा व्हावा, असं मला वाटत नाही."
सुनीता अहुजा यांनी पुढे बोलताना एका स्टारची पत्नी म्हणून येणाऱ्या अडचणींबद्दलही मौन सोडलं होतं. सुनीता अहुजा म्हणालेली की, जवळजवळ दररोज आपण स्टार्सच्या कोणत्या ना कोणत्या व्यक्तीसोबतच्या गॉसिप ऐकतो. पण, हे खूप कठीण आहे.
गोविंदा अन् सुनीता बऱ्याच काळापासून वेगळे राहतात?
घटस्फोटाच्या जोरदार चर्चा सुरू असतानाच असंही बोललं जात आहे की, सुनीता अहुजा आणि गोविंदा दोघेही बऱ्याच काळापासून वेगवेगळे राहतात. स्वतः सुनीता अहुजानं याबाबत बऱ्याचदा माध्यमांशी बोलताना खुलासा केला होता. अशातच येत्या काळात दोघेही काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहते पुरते हादरून गेले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























