Govinda On Sunita Ahuja: 'ती त्या गोष्टी बोलून जाते, ज्या तिनं कधीच बोलल्या नाही पाहिजेत...'; पत्नी सुनीतासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर गोविंदानं सोडलं मौन
Govinda On Sunita Ahuja: घटस्फोटाच्या अफवा गोविंदा यांनी फेटाळून लावलेल्या, पण सुनीता अहुजाच्या वक्तव्यांबाबत मात्र कधीच काहीच बोलले नाहीत. अशातच आता गोविंदा यांनी या सर्व प्रकरणावर मौन सोडलं आहे.

Govinda On Sunita Ahuja: बॉलिवूड स्टार (Bollywood Celebrity) गोविंदा (Govinda) आणि पत्नी सुनीता अहुाजा (Sunita Ahuja) यांच्या घटस्फोटाच्या (Divorce) चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगल्या आहेत. जेव्हा-जेव्हा घटस्फोटाच्या चर्चा झाल्या, तेव्हा-तेव्हा गोविंदा यांची पत्नी सुनीता अहुजा मीडियासमोर येऊन बरंच काही बोलून गेली. पण, अद्याप गोविंदा यांनी याबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. कित्येकदा सुनीता यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले. गोविंदा यांच्यावर प्रश्न उपस्थित केले गेले. पण, तरिसुद्धा गोविंदा यांनी चकार शब्दही तोंडून काढला नव्हता.
घटस्फोटाच्या अफवा गोविंदा यांनी फेटाळून लावलेल्या, पण सुनीता अहुजाच्या वक्तव्यांबाबत मात्र कधीच काहीच बोलले नाहीत. अशातच आता गोविंदा यांनी या सर्व प्रकरणावर मौन सोडलं आहे. नुकतंच गोविंदा काजोल आणि ट्विंकलच्या शोमध्ये उपस्थित राहिलेले. जिथे त्यांनी त्यांची पत्नी सुनीता अहुजाबद्दल आपलं मत स्पष्ट केलंय. यावेळी गोविंदा यांनी सुनीताला कुटुंबातलं बाळ असल्याचं म्हटलं आहे. तसेच, गेल्या काही वर्षांत सुनीतानं खूप चुका केल्यात आणि मी अनेकदा तिला माफ केलंय, असंही त्यांनी म्हटलंय.
"ती फक्त अशा गोष्टी बोलते ज्या तिने बोलू नयेत..."
सुनीताबद्दल प्रेमानं बोलताना गोविंदा म्हणाले की, "ती स्वतः एक लहान मूल आहे... माझी मुलं माझ्या पत्नीला लहान मुलासारखं वागवतात... सुनीता एका मुलासारखी आहे, पण ती तिच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्यांसह आमचं घर सांभाळू शकली, कारण ती आहे तशीच आहे... ती एक प्रामाणिक मुलगी आहे... तिचे शब्द कधीही चुकीचे नसतात... ती फक्त अशा गोष्टी बोलते, ज्या तिनं बोलू नयेत..." गोविंदा यांनी हे देखील कबूल केलं की, सुनीता यांच्या दृष्टिकोनातून गोष्टी समजून घेणं त्याला कधीकधी कठीण जातं. तो पुढे म्हणाला की, "पुरुषांची समस्या अशी आहे की, ते असा विचार करू शकत नाहीत. माझा नेहमीच असा विश्वास आहे की, पुरुष घर चालवतात, पण महिला जग चालवतात..."
गोविंदा यांचं मन जिंकणारं उत्तर
जेव्हा गोविंदाला विचारण्यात आलं की, सुनीता कधी त्याच्या चुका सुधारते का? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, "तिनं स्वतः अनेक चुका केल्या आहेत. मी तिला आणि संपूर्ण कुटुंबाला अनेक वेळा माफ केलंय..." तो पुढे म्हणाला की, "कधीकधी, मला वाटतं की, आपण त्यांच्यावर खूप अवलंबून होतो... विशेषतः जर तुमची आई तुमच्यासोबत नसेल, तर तुम्ही तुमच्या पत्नीवर खूप अवलंबून असता आणि जसजसा वेळ जातो, तसतसे ती तुम्हाला आईसारखं ओरडू लागते आणि आईसारखे तुम्हाला गोष्टी समजावून सांगू लागते. त्यांना ते कळत नाही, पण आपण ते पाहू शकतो. आता ते किती बदलले आहेत आणि ते लहान असताना कसे होते, ते आपण पाहू शकतो..."
महत्त्वाच्या इतर बातम्या:


















