(Source: Poll of Polls)
Bollywood Richest Family Owns 10000 Crore Empire: ना कपूर्स, ना चोप्रा अन् ना बच्चन; 'हे' बॉलिवूडचं सर्वात श्रीमंत कुटुंब; ज्यांची संपत्ती 10,000 कोटींच्या पार
Bollywood Richest Family Owns 10000 Crore Empire: बॉलिवूडच्या प्रतिष्ठीत घराण्यांबाबत विचारलं, तर अख्खी यादी वाचून काढाल. पण, जर तुम्हाला विचारलं की, बॉलिवूडचं सर्वात श्रीमंत कुटुंब कोणतं? तर...

Bollywood Richest Family Owns 10000 Crore Empire: बॉलिवूडकरासाठी (Bollywood News), फक्त ग्लॅमर, स्टारडम नाही, तर संपत्ती आणि प्रसिद्धीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. प्रत्येक स्टार प्रसिद्धी मिळवण्यासाठी, मोठा फॅनबेस बनवण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावतो, अख्खं आयुष्य समर्पित करतो. तेव्हा कुठे बॉलिवूड दिग्गजांमध्ये समावेश होतो. आता जर तुम्हाला बॉलिवूडच्या प्रतिष्ठीत घराण्यांबाबत विचारलं, तर अख्खी यादी वाचून काढाल. पण, जर तुम्हाला विचारलं की, बॉलिवूडचं सर्वात श्रीमंत कुटुंब कोणतं? तर तुम्ही कपूर्स, बच्चन, चोप्रा, भट्ट यांसारख्या दिग्गज अभिनेते, दिग्दर्शकांच्या कुटुंबांची नावं सांगाल. पण, तुम्हाला माहितीय का? बॉलिवूडचं सर्वात श्रीमंत कुटुंब ना बच्चन, ना कपूर्स आणि ना चोप्रा... बॉलिवूडचं सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणजे, कुमार... म्हणजेच, टी-सीरिजवाले कुमार, यांनी वर्षानुवर्ष फक्त म्युझिक इंडस्ट्रीवरच राज्य केलं नाही, तर फिल्म्समधूनही अब्जावधींची कमाई केली आहे. आज टी-सीरिजच्या कुटुंबाची एकूण संपत्ती अंदाजे, 10 हजार कोटींची आहे. यामुळेच ते बॉलिवूडच्या दिग्गजांच्या कुटुंबांना मागे टाकतात.
बॉलिवूडचं सर्वात श्रीमंत कुटुंब कोणतं? (Richest Family In Bollywood)
टी-सीरीजचे मालक भूषण कुमार हे बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत निर्माते म्हणून ओळखले जातात. मीडिया रिपोर्टनुसार, भूषण कुमार आणि त्यांच्या कुटुंबाकडे अंदाजे 10,000 कोटींची मालमत्ता आहे. भूषण कुमार हे टी-सीरीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि त्यांचे काका कृष्ण कुमार यांच्यासोबत कंपनी चालवतात. संगीतापासून सुरू झालेला हा वारसा आता चित्रपट आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर पसरला आहे.
गुलशन कुमार यांच्यापासून सुरू झालेली कुमार कुटुंबाच्या साम्राज्याची कहाणी (Gulshan Kumar T Series)
टी-सीरीजची सुरुवात 1983 मध्ये गुलशन कुमार यांनी केली होती. ज्या काळात म्युझिक कॅसेट्सचा ट्रेंड नवा होता, त्या काळात गुलशन कुमार यांच्या व्यावसायिक कौशल्यामुळे संगीत घराघरांत पोहोचलं. 'कयामत से कयामत तक' चित्रपटातील गाण्यांनी गुलशन कुमार यांच्या कंपनीला नवी ओळख मिळवून दिली. त्यानंतर 'आशिकी' सिनेमा आला, ज्याची गाणी रेकॉर्डब्रेक हिट झालं आणि टी-सीरीज घराघरात पोहोचलं. आज, ही कंपनी भारतातील सर्वात मोठी म्युझिक कंपनी आहे आणि जगातील सर्वाधिक सबस्क्राइब केलेलं YouTube चॅनेल आहे.
फक्त म्युझिकंच नाहीतर, फिल्म इंडस्ट्रीपर्यंत मारली मजल
टी-सीरीजनं फक्त म्युझिक इंडस्ट्रीतच नाहीतर, फिल्म इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवला आहे. 'भूल भुलैया 2' आणि 'तू झूठी मैं मक्कार'सारखे अलिकडचे सुपरहिट सिनेमे कंपनीच्या बॅनरखाली तयार करण्यात आले आहेत. टी-सीरीजच्या आगामी प्रमुख सिनेमांमध्ये 'भूल भुलैया ३' आणि 'मेट्रो... दिस डेज'सारख्या सिनेमांचा समावेश आहे. भूषण कुमार यांनी त्यांच्या वडिलांचा वारसा केवळ जपला नाही तर, तो आणखी वाढवला.
इतर मोठ्या कुटुंबांची दौलत
टी-सीरीजनंतर, यशराज फिल्म्सचे मालक असलेलं चोप्रा कुटुंब दुसऱ्या क्रमांकावर आहे. आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांची एकूण संपत्ती अंदाजे 8,000 कोटी आहे. अमिताभ बच्चन यांचं कुटुंब अंदाजे 4,500 कोटींच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, कपूर कुटुंब, ज्यामध्ये करीना कपूर खान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सारखे स्टार्स आहेत, त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 2,000 कोटी असल्याचं म्हटलं जातं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :



















