
Nick Jonas : निक जोनासने शेअर केला ‘मॉर्निंग मूड’, ‘डॅडी निक’ म्हणत चाहत्यांनी केले कौतुक!
Priyanka Chopra-Nick Jonas House : निक पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. निकने त्याच्या ‘मॉर्निंग मूड’ची झलक शेअर करण्यासाठी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Priyanka Chopra-Nick Jonas House : नुकतीच प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) यांनी त्यांच्या पहिल्या बाळाच्या जन्माची घोषणा केली होती. आता निक पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. निकने त्याच्या ‘मॉर्निंग मूड’ची झलक शेअर करण्यासाठी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात एक आवाज त्याला विचारतो की, ‘आता तुला काय वाटतंय?' यावर तो उत्तर देतो, ‘चला दिवस आणखी छान करूया’.
यावेळी निकने पांढऱ्या रंगाचा टी शर्ट आणि हिरव्या शर्ट परिधान केला होता. निक त्यांच्या लॉस एंजेलिसच्या घरी कॉफीचा आनंद घेताना दिसतोय. व्हिडीओत प्रियांका आणि निकच्या नव्या घराची झलक पाहायला मिळत आहे. त्याच्या मागे पांढरे पडदे, एक टीव्ही आणि बाग दिस आहे. सुंदर सकाळी निक कॉफी पीत त्याच्या चाहत्यांना दिवस आनंदमय जावा, म्हणून शुभेच्छा देत आहे. बाळाच्या जन्मानंतर निकची ही पहिलीच सोशल मीडिया पोस्ट आहे.
पाहा पोस्ट :
निकच्या या व्हिडीओमुळे चाहते देखील खुश झाले आहेत. त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याला कमेंटमध्ये ‘डॅडी निक’ असे संबोधले. तर, काहींनी त्याला ‘फादर फिगर’ म्हणत बाळाच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.
प्रियांका आणि निक यांनी 22 जानेवारीला त्यांच्या बाळाच्या जन्माची बातमी शेअर करण्यासाठी एक पोस्ट केली होती. त्यांनी लिहिले की, ‘आम्ही सरोगसीद्वारे पालक बनलो आहोत, हे कळवताना खूप आनंद होत आहे. आम्ही आदरपूर्वक या खास प्रसंगी चाहत्यांना गोपनीयता बाळगण्याचे आवाहन करतो. कारण आम्हाला आमचे लक्ष कुटुंबावर केंद्रित करायचे आहे. आभार!'
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 2018 साली लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील जोधपूर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. दोघांनीही लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. अलीकडेच प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पती निक जोनासचे आडनाव काढून टाकले होते, त्यानंतर त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. मात्र, नंतर ती केवळ अफवा असल्याचे समोर आले.
हेही वाचा :
- Yami Gautam : 'A Thursday' सिनेमाचा टीझर आऊट, यामी गौतमचा अनोखा अंदाज
- Sam Fernandes : सिनेनिर्माते सॅम फर्नांडिसने आदित्य पांचोली विरोधात केली तक्रार दाखल
- कौतुकास्पद! सोनू सूदनं अपघातात जखमी झालेल्या तरूणाची केली मदत, मोठा अनर्थ टळला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
