एक्स्प्लोर

मराठी सिनेमात येतोय नवा दमदार विषय, ‘अभया’चा फर्स्ट लूक समोर, मोहन जोशींसह स्टारकास्टची चर्चा

मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात वेगाने प्रगती करणारी ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट कंपनी सध्या चित्रपट, संगीत, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ओटीटीसारख्या विविध माध्यमांद्वारे आपला विस्तार करत आहे.

Abhaya Marathi Film Poster Out :मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एका दमदार कथानकाची भर पडणार आहे. मराठी चित्रपट ‘अभया’चा पहिला पोस्टर अधिकृतरीत्या प्रदर्शित करण्यात आला आहे. ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट लिमिटेडच्या निर्मितीत तयार होत असलेल्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक 13 मार्च 2026 रोजी रिलीज करण्यात आला. कंपनीचे अध्यक्ष डॉ. विमल राज माथुर यांनी सहनिर्माते रूपेश डी. गोहिल यांच्या उपस्थितीत या पोस्टरचे अनावरण केले. हा चित्रपट ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट लिमिटेड आणि आरडीजी प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने तयार होत आहे. मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात वेगाने प्रगती करणारी ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट कंपनी सध्या चित्रपट, संगीत, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ओटीटीसारख्या विविध माध्यमांद्वारे आपला विस्तार करत आहे.

दमदार कथानक आणि ताकदीची स्टारकास्ट

‘अभया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन युसुफ सुरती यांनी केले आहे. या चित्रपटात अभिनेत्री योगिता भोसले मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, कमलेश सावंत, गणेश यादव, रोहित कोकाटे आणि हर्षा निक्कम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.

‘अभया’ हा चित्रपट एका अशा महिलेच्या प्रवासाभोवती फिरतो, जी आयुष्यातील अनेक संकटांना धैर्य आणि निर्धाराने सामोरी जाते. संघर्ष, शक्ती आणि सशक्तीकरण या विषयांना अधोरेखित करणारी ही कथा प्रेक्षकांना भावनिकरित्या जोडणारी ठरेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.चित्रपटाबद्दल बोलताना कंपनीचे अध्यक्ष डॉ. विमल राज माथुर म्हणाले, “‘अभया’ ही अत्यंत भावनिक आणि प्रभावी कथा आहे. आयुष्यातील आव्हानांना धैर्याने सामोरे जाणाऱ्या एका स्त्रीची ताकद या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. प्रेक्षकांना अर्थपूर्ण आणि प्रभावी सिनेमॅटिक अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे.” दरम्यान, पोस्टर रिलीजसोबतच चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात झाली असून लवकरच या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलरही प्रदर्शित होणार आहे. दमदार विषय आणि मजबूत कलाकारांमुळे ‘अभया’ आधीपासूनच चर्चेत असून मराठी चित्रपटसृष्टीत हा चित्रपट विशेष ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget