एक्स्प्लोर

गौतमीचं नादखुळा आयटम साँग... माझ्या रुपावर फिदा दुनिया सारी; लटके, झटके अन् घायाळ करणाऱ्या अदा

अल्पावधीतच या गाण्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.गाण्याच्या ओळींनी आणि गौतमीच्या नृत्याने अर्थातच थिरकायला भाग पाडलं आहे

Gautami Patil: 'सोनचाफा' गाण्यातून बहरतायत गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) अदा, दमदार परफॉर्मन्समुळे आयटम साँगची चर्चा 'साईरत्न एंटरटेनमेंट'च्या 'सोनचाफा' गाण्यात गौतमी पाटीलचा धुवाधार परफॉर्मन्स, अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस 'माझ्या रुपावर फिदा झाली दुनिया सारी' या 'सोनचाफा' गाण्यातील ओळींप्रमाणेच नृत्यांगना गौतमी पाटीलच्या रूपावर खरंच दुनिया फिदा आहे, यांत शंकाच नाही. (Gautami Patil New Song Out)

काही दिवसांपासून 'सोनचाफा' गाण्याची चर्चा सुरु होती, अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. गौतमी पाटीलचं दिलखेचक अदांनी भरलेलं हे नवंकोरं 'सोनचाफा' हे गाणं आता रसिकांच्या भेटीस आलं आहे. गाण्याच्या ओळींनी आणि गौतमीच्या नृत्याने अर्थातच थिरकायला भाग पाडलं आहे. अल्पावधीतच या गाण्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.

गौतमीच्या लूकनेही साऱ्यांना केलं घायाळ

हे गाणं 'साईरत्न एंटरटेनमेंट' या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित झालं आहे. यापूर्वीही 'साईरत्न एंटरटेनमेंट'साठी गौतमी पाटीलने दोन गाणी केली. 'सुंदरा' आणि 'कृष्ण मुरारी' या गौतमीच्या दोन्ही गाण्यांना भरभरुन प्रतिसाद मिळाला. यानंतर आता 'साईरत्न एंटरटेनमेंट' गौतमीसह 'सोनचाफा' हे नवं गाणं घेऊन आलं आहे. 'सोनचाफा' या आयटम साँगवर गौतमीचा नयनरम्य असा नृत्याविष्कार साऱ्यांना बेधुंद करणारा आहे. गौतमीच्या लूकनेही साऱ्यांना घायाळ केलं आहे. 'साईरत्न एंटरटेनमेंट' या प्रॉडक्शन हाऊसच हे गाणं निर्माते संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर यांनी निर्मित केलं आहे. दिग्दर्शक अर्चित वरवडे यांनी हे गाणं दिग्दर्शित केलं आहे. संगीतकार रोहित नागभिडे यांनी संगीत केलेलं हे गाणं गायिका मुग्धा कऱ्हाडे यांनी स्वरबद्ध केलं आहे. तर गाण्याचे बोल वैभव देशमुख यांनी लिहिले आहे.

या गाण्याच्या प्रवासाबाबत बोलताना गौतमी पाटील म्हणाली, " 'साईरत्न एंटरटेनमेंट'बरोबर हे माझं तिसरं गाणं आहे. सोनचाफा हे गाणं करताना खूप मज्जा आली. गाण्यातील लूक, डान्स स्टेप सगळंच भारी होतं. आणि माझ्या साऱ्या चाहत्यांना हे गाणं नक्की आवडेल याची खात्री आहे". तर निर्माते संदेश गाडेकर म्हणाले, "साईरत्न एंटरटेनमेंट' नेहमीच रसिकांसाठी नवनवीन गाणी घेऊन येत असतं. अशातच आता सोनचाफा हे गाणं या यादीत आलं आहे. गौतमीच्या डान्सने तर साऱ्यांना वेड केलं आहे. तिच्या नृत्याचे लाखो चाहते आहेतच आणि आताही या सोनचाफा मधील तिचा परफॉर्मन्स अनेकांच्या मनावर राज्य करत आहे".

महत्त्वाच्या बातम्या

'टॉक्सिक'मुळे श्रद्धा कपूरच्या 'ईठा'ची रिलीज डेट पुढे ढकलणार? बॉक्स ऑफिस क्लॅश टाळण्यासाठी निर्मात्यांचा मोठा निर्णय
'टॉक्सिक'मुळे श्रद्धा कपूरच्या 'ईठा'ची रिलीज डेट पुढे ढकलणार? बॉक्स ऑफिस क्लॅश टाळण्यासाठी निर्मात्यांचा मोठा निर्णय
Evil Dead Burn Review: कमकुवत मनाच्या प्रेक्षकांनी चुकुनही पाहू नका 'हा हॉररपट; हॉररप्रेमींना मात्र येणार भन्नाट अनुभव
कमकुवत मनाच्या प्रेक्षकांनी चुकुनही पाहू नका 'हा हॉररपट; हॉररप्रेमींना मात्र येणार भन्नाट अनुभव
Chhaya Kadam Shared Aashadhi Ekadashi Vaari Experience: 'दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी...'; वारकऱ्यांसोबत विठुनामाच्या गजरात छाया कदम तल्लीन, PHOTOs
'दुसरी वारी सासवड ते जेजुरी पायी...'; वारकऱ्यांसोबत विठुनामाच्या गजरात छाया कदम तल्लीन, PHOTOs
Pravin Tarde On Mohan Joshi: 'देऊळ बंद 2'च्या सेटवर प्रविण तरडेंची आदळआपट, चिडचिड; मग मोहन जोशी द्यायचे 'ती' धमकी अन्...; धमाल किस्सा ऐकलात?
'देऊळ बंद 2'च्या सेटवर प्रविण तरडेंची आदळआपट, चिडचिड; मग मोहन जोशी द्यायचे 'ती' धमकी अन्...; धमाल किस्सा ऐकलात?

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
Share Market : अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांची दीड लाख कोटींची कमाई, बाजारातील तेजीचं नेमकं कारण काय?
अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Shiv Puran: मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
Embed widget