एक्स्प्लोर
Voter List Fraud: 'निवडणुकीपुरते येतात, पैसे घेतात आणि निघून जातात', MNS-ठाकरे गटाचा गंभीर आरोप
कल्याण ग्रामीण (Kalyan Rural) विधानसभा मतदारसंघातील दिवा (Diva) शहराच्या मतदार याद्यांमध्ये (Voter Lists) तब्बल १७,२५१ दुबार नावं असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ठाकरे गट (Thackeray Group) आणि मनसे (MNS) यांनी संयुक्तपणे जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने (Vaishali Mane) यांच्याकडे तक्रार केली आहे. 'ज्यांना त्या एरियाशी काही संबंध नसतो, ते निवडणुकीपुरते येतात, त्यांना त्याचा मोबदला दिला जातो आणि ते निघून जातात,' असा गंभीर आरोप तक्रारदारांनी केला आहे. या पक्षांच्या शिष्टमंडळाने दुबार नावांची संपूर्ण यादीच अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली असून, यादी दुरुस्त करण्याची मागणी केली. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी करून नावे वगळण्याचे आश्वासन दिले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
















