VIDEO : सखूबाई..,गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, जोडी दिसतेय कमाल
Gautami Patil and Siddharth Jadhav dance video : नृत्यांगणा गौतमी पाटील आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव यांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

Gautami Patil and Siddharth Jadhav dance video : नृत्यांगणा गौतमी पाटील आणि मराठी सिनेक्षेत्रातील अभिनेता सिद्धार्थ जाधव यांचा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. (Gautami Patil and Siddharth Jadhav dance video) सिद्धार्थ जाधव आणि गौतमी पाटील यांचं 'सखूबाई' हे गाणं प्रेक्षकांच्या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. naadsstream या यूट्यूब चॅनेलवर हे गाणं रिलीज केलं जाणार आहे. मात्र, तत्पूर्वी या गाण्याचा एक प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलाय. "गौतमी पाटीलची अदाकारी आणि सिद्धार्थ जाधवची कलाकारी...सखूबाई येतेय तुमच्या भेटीला, उद्या सकाळी ११ वाजता... फक्त @naadsstream या युट्यूब चॅनेलवर...", असं कॅप्शनही हा व्हिडीओ शेअर करताना देण्यात आलंय. (Gautami Patil and Siddharth Jadhav dance video)
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच नृत्यांगना गौतमी पाटीलचं (Gautami Patil dance video)'इश्काची बुलेट' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं होतं.. हे गाणं प्रदर्शित होताच काही वेळातच सोशल मीडियावर त्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या गाण्यात गौतमी पाटील घुंगट घेऊन मंचावर येते आणि आपलं नृत्य सादर करते. गाण्याच्या दृश्यांमध्ये ती दोन मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्तींसमोर नाचताना दिसते. या गाण्यासाठी तिने पेहरावाकडे विशेष लक्ष दिलं असून, तिने नथही परिधान केलेली होती. हे गाणं MH STAR MUSIC या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केलेलं होतं. या गाण्याची निर्मिती विठ्ठल पाडोळे यांनी केली होती. गाण्याचे शब्दही त्यांनीच लिहिले असून, त्याला गायत्री शेलार-साळवे यांनी स्वरबद्ध केलं आहे. या गाण्यात गौतमीसोबत विठ्ठल पाटोळे आणि रियाज शेख हे कलाकारही झळकत आहेत.
दरम्यानच्या काळात गौतमी पाटीलला चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजनमध्येही आपली ओळख निर्माण करण्याच्या संधी मिळू लागल्या. झी मराठीवरील 'देवमाणूस' या मालिकेत तिला नृत्यांगनेची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर विविध टीव्ही शोमध्येही तिचं स्वागत केलं जाऊ लागलं. त्यामुळे स्टेजवर नृत्य सादर करणारी गौतमी आता टेलिव्हिजनपासून ते सिनेसृष्टीपर्यंत पोहोचली आहे. सध्या तिचं नवीन गाणं सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
'ते गाणं आलं अन् लोकांना वाटू लागलं माझं शरीर फार मोठं आहे..', अभिनेत्री तमन्ना भाटियाचं वक्तव्य























