एक्स्प्लोर

'गारुड' चित्रपटातील रहस्य उलगडण्यात गिरीश कुलकर्णी आणि शशांक शेंडेंचा मोठा वाटा, नक्की काय घडणार?

Marathi Movie : रहस्य उलगडणारा 'गारुड' हा सिनेमा येत्या 25 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Marathi Movie : शोध हा कधीच संपत नाही, माणूस नेहमीच कशा ना कशाच्या शोधात असतोच. बरेचदा  हे शोध पूर्ण होतात तर काहीवेळा ही गणिते न उलगडणारी असतात. अशातच एका रात्रीतील अनेक गूढ लवकरच मोठया पडद्यावर उलगडण्यास सज्ज होत आहेत. कारण रहस्य उलगडणारा 'गारुड' (Marathi Movie) हा सिनेमा येत्या 25 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. स्वप्नांच्या दुनियेत वावरत असताना एखाद्या शोधात गुरफटत गेलेली एक रहस्यमय कथा 'गारुड' या चित्रपटातून समोर येणार आहे.

नुकतीच या चित्रपटातील कलाकारांची नावे समोर आली आहेत. काळोखातील प्रकाशाच्या शोधातील हे 'गारुड' चित्रपटाचे मोशन पोस्टर आणि कलाकारांची नावे समोर आल्याने चित्रपटाबाबतची  उत्सुकता अधिकच वाढवत आहे. 'किमयागार फिल्म्स', 'एल एल पी' आणि 'ड्रीमव्हीवर' निर्मित आणि 'सनशाईन स्टुडिओ' प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती निर्माते ध्रुव दास, तृप्ती संजय राऊत, श्वेता देवेंद्र गुजर-शाह यांनी केली आहे. तसेच सह निर्माते म्हणून स्मृती प्रमोद खाडिलकर, अमोद चंद्रशेखर परांजपे, श्रुती ओंकार संगोराम यांनी बाजू सांभाळली. 

हे कलाकार दिसणार सिनेमात

चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेते, अभिनेते गिरीश कुलकर्णी, दमदार अभिनेते शशांक शेंडे यांसह पायल पांडे, सचिन वळंजू, धनंजय सरदेशपांडे ही कलाकारांची फौज कथेमागील रहस्य गडद करताना दिसणार आहेत. तर तृप्ती राऊत, संतोष आबाळे, उमा नामजोशी, पंडित ढवळे, वैष्णवी जाधव, सार्थक शिंदे हे सहकलाकार चित्रपटात झळकणार आहेत. तर दिग्दर्शक प्रताप विठ्ठलराव सोनाळे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  चित्रपटाची कथा डॉ. प्रमोद खाडिलकर लिखित असून रहस्यमय अशा लक्षवेधी संगीताची जबाबदारी ओंकार संगोराम यांनी संभाळली आहे. चित्रपटाच्या संगीताबरोबरचं पार्श्वसंगीत हे वाखाणण्याजोगे आहे. ही पार्श्वसंगीताची धुरा संकेत पाटीलने संभाळली आहे.

चित्रपटाबाबत बोलताना दिग्दर्शक प्रताप सोनाळे म्हणाले की, "हा एक काल्पनिक चित्रपट आहे. पण मग यात विशेष असे काय आहे तर याची हाताळणी. ही हाताळणी आपल्या आजच्या वास्तविकतेशी मिळतीजुळती आहे, यातील प्रत्येक गूढ पात्र इतर पात्रांसोबत होणाऱ्या देवाणघेवाणीतून उलगडत जातं. त्यातूनच त्यांच्या कथेच्या, त्यांच्या शोधाच्या आवृत्त्या सादर होतात, पण ते शोध प्रेक्षकांच्या समोर येतात एका रंजक, गूढ, रहस्यमयी वेशात. त्याचं 'गारूड' आपल्या संवेदनांवर पकड घेतंच पण आपल्या मेंदूवरही आणि एक वास्तवकथाच पाहील्याची अनुभूती मिळते", असं म्हणत त्यांनी सुंदर अशा रहस्यमय कथेची ओळख करुन दिली आहे. 'गारुड' हा रहस्यमय चित्रपट येत्या 25 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ही बातमी वाचा : 

Suraj Chavan : बिग बॉसच्या विजयानंतर दुसरी आनंदाची बातमी, आगामी सिनेमाचा ट्रेलर सूरजनेच केला रिलीज; म्हणाला, 'आता माझा सिनेमा सगळे रेकॉर्ड मोडणार...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PETA Letter To Salman Khan : बिग बॉसच्या घरात बांधलेल्या गाढवामुळे सलमान खानच्या अडचणी वाढणार? PETA नं धाडलंय पत्र
बिग बॉसच्या घरात बांधलेल्या गाढवामुळे सलमान खानच्या अडचणी वाढणार? PETA नं धाडलंय पत्र
Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
Suhas Kande : समीर नाही तर छगन भुजबळांनीचं नांदगावमधून उभं राहावं, निवडणुकीत त्यांना पाडू शकतो, सुहास कांदेंचं आव्हान, महायुतीत वादाची ठिणगी
पंकज आणि समीर भुजबळ राजकीय दृष्ट्या छोटे, छगन भुजबळांनीचं माझ्यासमोर निवडणूक लढवावी : सुहास कांदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar On Ratan Tata Sad Demise  : उद्योगपती रतन टाटा यांना शरद पवारांकडून श्रद्धांजलीABP Majha Headlines :  7  AM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPM On Ratan Tata Sad Demise : रतन टाटा एक दयाळू आत्मा आणि विलक्षण मानव होते यांच्या निधनाने दु:खDeepak Kesarkar on Ratan Tata Sad Demise : रतन टाटा यांचं निधन, सरकारने जाहीर केला एक दिवसाचा दुखवटा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PETA Letter To Salman Khan : बिग बॉसच्या घरात बांधलेल्या गाढवामुळे सलमान खानच्या अडचणी वाढणार? PETA नं धाडलंय पत्र
बिग बॉसच्या घरात बांधलेल्या गाढवामुळे सलमान खानच्या अडचणी वाढणार? PETA नं धाडलंय पत्र
Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
Suhas Kande : समीर नाही तर छगन भुजबळांनीचं नांदगावमधून उभं राहावं, निवडणुकीत त्यांना पाडू शकतो, सुहास कांदेंचं आव्हान, महायुतीत वादाची ठिणगी
पंकज आणि समीर भुजबळ राजकीय दृष्ट्या छोटे, छगन भुजबळांनीचं माझ्यासमोर निवडणूक लढवावी : सुहास कांदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
Embed widget