एक्स्प्लोर

Suraj Chavan : बिग बॉसच्या विजयानंतर दुसरी आनंदाची बातमी, आगामी सिनेमाचा ट्रेलर सूरजनेच केला रिलीज; म्हणाला, 'आता माझा सिनेमा सगळे रेकॉर्ड मोडणार...'

Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या विजयानंतर सूरजनेच त्याच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे.

Suraj Chavan : सध्या सर्वत्र 'बिग बॉस मराठी'ची (Bigg Boss Marathi Season 5) हवा सुरु आहे. यंदाच्या 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने (Suraj Chavan) नाव कोरलं. 'बिग बॉस मराठी' सीझन 5 या पर्वाचे विजेतेपद मिळवल्यानंतर सूरजचं भरभरुन कौतुक करण्यात आलं. 'बिग बॉस'ची ट्रॉफी घेऊन आता सूरज त्याच्या गावी मोढवे ,तालुका बारामतीत परतला आहे. याचदरम्यान सूरजने त्याच्या आगामी सिनेमाचा ट्रेलरही नुकताच लॉन्च केलाय. 

सूरज 'बिग बॉस'च्या ट्रॉफीसह त्याच्या मोढवे गावातील आई मरीमातेच्या चरणी नतमस्तक होत त्याने त्याच्या आगामी 'राजा राणी' चित्रपटाचा स्वतःच्या हस्ते ट्रेलर लॉन्चृही केला आहे. बारामतीत सूरजच्या हस्ते मोढवे गावात 'राजा राणी' चित्रपटाच्या ट्रेलरचं अनावरण करण्यात आलं , यावेळी सुरजच्या 'राजाराणी' च्या ट्रेलर लाँच सोहळ्यात बिग बॉस फेम वैभव चव्हाण ने सुद्धा उपस्थिती लावली आणि सुरजचा 'राजाराणी' चित्रपट सर्वांनी नक्की बघा असं वैभवने म्हटलं आहे. त्याचप्रमाणे बिग बॉस जिंकलो , आता माझा राजाराणी चित्रपट सर्व रेकॉर्ड मोडणार अशी प्रतिक्रिया सूरजने दिली आहे. 

सूरजचा सिनेमा येणार भेटीला

बऱ्याच दिवसांपासून 'राजाराणी' या चित्रपटाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. या चित्रपटात सूरज चव्हाण महत्त्वाचा भूमिकेत दिसणार आहे. छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सूरजने झगमगाटीच्या दुनियेत प्रवेश करत उत्तम यश मिळवले. छोटा पडदा गाजवल्यानंतर आता सूरज येत्या 18 ऑक्टोबर पासून मोठा पडदा गाजवायलाही सज्ज होणार आहे. सत्य घटनेवर आधारित उलगडणार्‍या 'राजाराणी' या प्रेमकथेतून तो महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात रोहन पाटील , सुरज चव्हाण , तानाजी गळगुंडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्येही नायक नायिकेच्या प्रेमाला एकत्र आणण्यासाठी सूरज महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतोय. ट्रेलरमध्येही त्याचा गोलीगत पॅटर्न पाहणं रंजक ठरतंय.

चित्रपटात प्रमुख भूमिकेत रोहन पाटील, वैष्णवी शिंदे ही जोडी दिसणार असून या चित्रपटात सुरज चव्हाण ,भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 'सोनाई फिल्म क्रिएशन' प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केलं आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर हे आहेत. तर छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी यांनी केले आहे. सूरजचा चव्हाणचा 'राजा राणी' हा चित्रपट 18 ऑक्टोबर पासून जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

ही बातमी वाचा : 

Gunaratna Sadavarte: '... तर खंडाळा घाटात माझा एन्काऊंटर झालाच असता', बिग बॉसच्या घरात शरद पवारांचे नाव घेत सदावर्तेंचा गौप्यस्फोट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
Suhas Kande : समीर नाही तर छगन भुजबळांनीचं नांदगावमधून उभं राहावं, निवडणुकीत त्यांना पाडू शकतो, सुहास कांदेंचं आव्हान, महायुतीत वादाची ठिणगी
पंकज आणि समीर भुजबळ राजकीय दृष्ट्या छोटे, छगन भुजबळांनीचं माझ्यासमोर निवडणूक लढवावी : सुहास कांदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar On Ratan Tata Sad Demise  : उद्योगपती रतन टाटा यांना शरद पवारांकडून श्रद्धांजलीABP Majha Headlines :  7  AM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPM On Ratan Tata Sad Demise : रतन टाटा एक दयाळू आत्मा आणि विलक्षण मानव होते यांच्या निधनाने दु:खDeepak Kesarkar on Ratan Tata Sad Demise : रतन टाटा यांचं निधन, सरकारने जाहीर केला एक दिवसाचा दुखवटा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
रतन टाटांच्या निधनानंतर भारतातून पळून गेलेला उद्योगपती विजय माल्ल्यालाही राहवलं नाही, ट्विट करुन म्हणाला
Suhas Kande : समीर नाही तर छगन भुजबळांनीचं नांदगावमधून उभं राहावं, निवडणुकीत त्यांना पाडू शकतो, सुहास कांदेंचं आव्हान, महायुतीत वादाची ठिणगी
पंकज आणि समीर भुजबळ राजकीय दृष्ट्या छोटे, छगन भुजबळांनीचं माझ्यासमोर निवडणूक लढवावी : सुहास कांदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Embed widget