Friday OTT Release: एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट अन् एंटरटेनमेंट; ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका, काय पाहाल?
Friday OTT Release: यावेळी पुन्हा शुक्रवार मनोरंजनानं परिपूर्ण असेल. खरंतर आज ओटीटीवर अनेक नवनवे चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित झाल्या आहेत, ज्या तुम्ही घरी बसून आरामात पाहू शकता.

Friday OTT Release: आठवड्यात शुक्रवार आला की, त्यासोबतच काम संपवण्याची, लॅपटॉप बंद करण्याची, ऑफिस ग्रुप चॅट म्यूट करण्याची वेळ येते. त्यासोबतच विकेंडला काय करायचं याचाही विचार सुरू होतो. मग, ऑफिसच्या धकाधकीतून थकलेलं मन मस्त घरीच आराम करत ओटीटीवर काहीतरी पाहण्याचा सल्ला देतं. आजही शुक्रवारी, आज अनेक सिनेमे, वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नेटफ्लिक्स, झी5 आणि जिओहॉटस्टार सारख्या आघाडीच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर अनेक रोमांचक चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे विकेंडला घरीचा काहीतरी मस्त बेत आखा, एसी सुरू करा आणि नव्या चित्रपटांसोबतच वेब सीरिजची मेजवाणी चाखा...
'ज्वेल थीफ : द हीस्ट बिगिन्स' (Jewel Thief - The Heist Begins)
सैफ अली खान अपली लेटेस्ट फिल्म 'ज्वेल थीफ - द हीस्ट बिगिन्स' सोबत ओटीटीवर धमाल करायला आली आहे. सिद्धार्थ आनंद यांची निर्मिती असलेल्या या फिल्ममध्ये जयदीप अहलावतही महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. ही फिल्म 25 एप्रिलपासून ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्स पर स्ट्रीम केली जाणार आहे.
हॅवोक
क्रिस इव्हान्सनं हॅवोक या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात टॉम हार्डी, जेसी मेई ली, टिमोथी ऑलिफंट आणि फॉरेस्ट व्हिटकर यांच्याही भूमिका आहेत. 25 एप्रिल 2025 पासून नेटफ्लिक्सवर हॅवॉकचं स्ट्रीमिंग सुरू होईल.
थारुनम (Tharunam)
नवा तमिळ रोमँटिक थ्रिलर चित्रपट थरुनम अरविंद श्रीनिवासन यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. झेन स्टुडिओजच्या बॅनरखाली पुगाझ आणि ईडन यांनी याची निर्मिती केली आहे, ज्यामध्ये किशन दास आणि स्मृती वेंकट मुख्य भूमिकेत आहेत, तर राज अय्यप्पा आणि बाला सरवनन देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. थरुनम 25 एप्रिल 2025 पासून टेंटकोटवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
अय्यना माने (Ayyana Mane)
अय्यना माने हा एक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे, जो जाजी नावाच्या एका नवविवाहित महिलेच्या जीवनावर आधारित आहे, जी कुटुंबातील मृत्यूंची मालिका आणि पवित्र कोंडय्या मूर्तीशी संबंधित लपलेलं सत्य उलगडते. कुटुंबातील आणखी एका अनपेक्षित मृत्यूमुळे त्याला गूढ उकलण्याची प्रेरणा मिळते. हा चित्रपट आजपासून म्हणजेच, 25 एप्रिलपासून ZEE5 वर प्रसारित होणार आहे.
मॅड स्क्वेअर (Mad Square)
मॅड स्क्वायर हा तेलुगू भाषेतील अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे, जो कल्याण शंकर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. हरिका सूर्यदेवरा आणि एस. नागा वामसी, मॅड स्क्वेअर यांच्या पाठीशी नरणे नितीन, संगीत शोभन, राम नितीन आणि प्रियांका जवळकर हे कलाकार आहेत. चित्रपटाच्या थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. मॅड स्क्वायर 25 एप्रिल 2025 रोजी म्हणजेच, आज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
काजिलियनेअर (KAJILLIONAIRE)
2020 चा अमेरिकन क्राईम कॉमेडी-ड्रामा चित्रपट काजिलियनेअर ओटीटीवर आला आहे. या चित्रपटात इव्हान राहेल वूड, डेब्रा विंगर आणि रिचर्ड जेनकिन्स हे एका किरकोळ गुन्हेगारी कुटुंबातील सदस्यांच्या भूमिकेत आहेत. जेव्हा एखादा अनोळखी व्यक्ती त्यांच्या योजनांमध्ये सामील होतो, तेव्हा त्यांच्या नात्यात कटुता येते. ही कथा दोन फसवणूक करणाऱ्यांची मुलगी ओल्ड डोलिओभोवती फिरते, जी तिचे भाडे देण्यासाठी एक नवी योजना घेऊन येते. पण जेव्हा त्याचे पालक एका अनोळखी व्यक्तीला, मेलानीला त्यांच्या योजनेत सामील होण्यासाठी आमंत्रित करतात, तेव्हा डोलिओचे जग उलटे होते. 25 एप्रिलपासून ते जिओ हॉटस्टारवर स्ट्रीमिंग होत आहे.























