(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pradeep Guha passed away | टाइम्स ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष, चित्रपट निर्माते प्रदीप गुहा यांचे निधन
टाइम्स ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आणि चित्रपट निर्माते प्रदीप गुहा यांचे आज मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले.
मुंबई : 'टाइम्स ऑफ इंडिया' आणि नंतर बराच काळ डीएनएशी संबंधित असलेले प्रदीप गुहा यांचे आज मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते यकृताच्या कर्करोगाचे (स्टेज 4) रुग्ण होते.
त्यांनी हृतिक रोशन आणि करिश्मा कपूर स्टारर 'फिजा' आणि 2001 मध्ये रिलीज झालेल्या मिथुन आणि डिंपल कपाडिया स्टारर 'फिर कभी'ची निर्मिती केली होती.
तीन दशक टाइम्स ऑफ इंडियाशी संबंधित राहिल्यानंतर 2005 मध्ये त्यांनी झी टेलिफिल्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. नंतर ते 9X मीडियामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून सहभागी झाले.
गुहा यांच्या उपचारासाठी त्यांचे कुटुंब न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध स्लोन केटरिंग कॅन्सर हॉस्पिटलचा सल्ला घेत होते. गेल्या अनेक दिवसांपासून सतत बिघडत चाललेल्या प्रकृतीमुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगा आहे.