Farhan Akhtar First Wife: तब्बल 6 वर्षांनी मोठी होती पहिली पत्नी, 17 वर्षांच्या नात्यानंतर झाला फरहान-अधुनाचा घटस्फोट!
अधुना भाबानी आणि फरहान अख्तर यांचा 2017 मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट झाला. ते दोन मुलींचे पालक आहेत.
Farhan-Adhuna Divorce : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) लवकरच शिबानी दांडेकरसोबत (Shibani Dandekar) लग्न बंधनात अडकणार आहेत. दोघेही मुंबईत एका खाजगी समारंभात लग्न करणार आहेत. फरहानचे हे दुसरे लग्न आहे. याआधी फरहानने अधुना भाबानीशी (Adhuna Bhabani) लग्न केले होते, पण त्यांचे नाते टिकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला. अधुना आणि फरहान यांचा 2017मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट झाला होता. दोघेही दोन मुलींचे पालक असून त्यांच्या संगोपनात दोघेही घटस्फोटानंतरही कोणतीही कसर सोडत नाहीत.
अधुना आणि फरहानची पहिली भेट 'दिल चाहता है' चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान झाली होती. तीन वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी 2000 साली लग्न केले होते. अधुना ही एक प्रसिद्ध उद्योजक आहे. हेअरस्टाइलच्या जगात अधुना हे एक प्रसिद्ध नाव आहे. ती फरहानपेक्षा तब्बल 6 वर्षांनी मोठी आहे.
सेलिब्रिटी हेअरस्टाईल अधुना!
अधुनाला सुरुवातीपासूनच हेअरस्टायलिस्ट व्हायचे होते आणि तिने तिचे स्वप्न साकार केले. अधुना बंगाली-ब्रिटिश कुटुंबातील आहे. तिने हेअरस्टाईलच्या जगात खूप नाव कमावले आहे. तिचा भाऊ ओश भबानीसह ती यूकेमध्ये अनेकांना प्रशिक्षण देते. अधुनाने अनेक सेलिब्रिटींची केशरचना सांभाळली आहे.
फरहानच्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटात तिने सर्व कलाकारांची हेअरस्टाईल केली होती. 2004 मध्ये तिने ‘BBlunt’ नावाचा हेअरस्टाइल ब्रँड लॉन्च केला. तिच्याकडे अनेक सलून देखील आहेत. अधुना आणि तिच्या टीमने 'दिल चाहता है', 'दिल धडकने दो', 'दंगल', 'रईस'सह 50 बॉलिवूड चित्रपटांमध्ये हेअर स्टायलिंगचे काम केले आहे.
फरहानपासून घटस्फोट घेतल्यानंतर 54 वर्षीय अधुना निकोलो मोरियाच्या प्रेमात पडली. 2019 मध्ये, त्याने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करून निकोलोसोबतचे नाते अधिकृत केले, परंतु दोघांनी अद्याप लग्न केलेले नाही.
हेही वाचा :
- Shibani Dandekar : कोण आहे फरहान अख्तरची होणारी पत्नी शिबानी दांडेकर? क्रिकेटसोबत आहे खास कनेक्शन
- Farhan Shibani Wedding: ना लग्न ना निकाह, ‘या’ खास पद्धतीने फरहान-शिबानी बांधणार साताजन्माची गाठ!
- रिअॅलिटी शोमध्ये झाली नजरानजर, मग झाली सहमती, अशी सुरू झाली फरहान आणि शिबानीची प्रेमकहाणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha