Sara Ali Khan: 'हर हर महादेव',सारा अली खाननं घेतलं उज्जैनच्या महाकाल देवाचं दर्शन; पाहा व्हिडीओ

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 25 Jun 2023 08:08 PM
Sara Ali Khan: 'हर हर महादेव',सारा अली खाननं घेतलं उज्जैनच्या महाकाल देवाचं दर्शन; पाहा व्हिडीओ
'जरा हटके जरा बचके (Zara Hatke Zara Bachke)' हा चित्रपट हिट ठरल्यानंतर सारानं उज्जैनच्या महाकाल देवाचं दर्शन घेतलं आहे. Read More
IB 71 OTT Release: विद्युत जामवाल आणि अनुपम खेर यांचा IB 71 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार चित्रपट
IB 71 हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? याबाबत जाणून घेऊयात... Read More
Maharashtra Television News : कुशल बद्रिकेची पोस्ट ते रुपाली भोसलेची स्ट्रगल स्टोरी; मराठी मालिका विश्वातील बातम्या वाचा एका क्लिकवर!
Maharashtra Television News : मराठी मालिका विश्वात सध्या काय घडतंय? छोट्या पडद्यावरील कलाकारांबद्दल जाणून घ्या... Read More
'तो काळ फारच भीषण होता...'; जेव्हा रुपाली भोसलेनं सांगितली होती तिची स्ट्रगल स्टोरी
एका मुलाखतीमध्ये रुपालीनं (Rupali Bhosle) तिच्या स्ट्रगल स्टोरीबाबत सांगितलं होतं. Read More
Gehana Vasisth: फैजान अन्सारीसोबतच्या लग्नाच्या चर्चेवर गेहना वशिष्ठनं सोडलं मौन; सांगितलं व्हायरल फोटोमागील सत्य
गेहना (Gehana Vasisth) आणि फैजान यांचे लग्न झाले आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. Read More
Kiara Advani : कियारा आडवाणी प्रेग्नंट? 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण; बेबी बंपने वेधलं चाहत्यांचं लक्ष
Kiara Advani : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी प्रेग्नंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. Read More
Parineeti Chopra: 'माझं अजून लग्न झालेलं नाही'; पापराझीच्या प्रश्नाला परिणीतीचं उत्तर
नुकताच परिणीतीचा (Parineeti Chopra) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Read More
Jug Jugg Jeeyo 2 : 'जुग जुग जियो' मल्टीस्टारर सिनेमाचा सीक्वेल येणार? करण जोहरने दिली हिंट
Karan Johar : करण जोहरच्या 'जुग जुग जियो' या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Sehwag Trolls Adipurush: 'आदिपुरुष पाहिल्यावर कळालं, कटप्पानं बाहुबलीला का मारलं'; विरेंद्र सेहवागनं आदिपुरुष चित्रपटावर केली टीका
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन विरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) आदिपुरुष (Adipurush) चित्रपटाला ट्रोल केलं आहे.   Read More
Marathi Serial : 'ठरलं तर मग' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर; 'आई कुठे काय करते' पडली मागे
Marathi Serial : ठरलं तर मग' या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. Read More
Deepa Parab: 'तू चाल पुढं' मालिकेतील अश्विनीचा खऱ्या आयुष्यातील जोडीदार आहे मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता; सुपरहिट चित्रपटात केलंय काम
‘तू चाल पुढं’ (Tu Chal Pudha) मालिकेतील अश्विनीचा खऱ्या आयुष्यातील जोडीदार कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. Read More
Adipurush : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'आदिपुरुष'ची वाटचाल 300 कोटींच्या दिशेने; जाणून घ्या आतापर्यंतचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Adipurush Movie : 'आदिपुरुष' सिनेमाने रिलीजच्या नवव्या दिवशी 5.25 कोटींची कमाई केली आहे. Read More
Kushal Badrike : पहिला पाऊस पडताच 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज; कुशल बद्रिके पोस्ट शेअर करत म्हणाला,"कोसळू देतो त्याला तुझ्या आठवांसारखा"
Kushal Badrike : कुशल बद्रिकेची रोमँटिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Ram Charan - Upasana : मुलगी झाली हो! राम चरणने मोठ्या दिमाखात केलं लेकीचं स्वागत; उपासनाने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे मानले आभार
Upasana Post : लेकीला प्रेम दिल्याबद्दल उपासनाने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. Read More
Shivali Parab : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबला हवाय कॉफी पार्टनर; पोस्ट शेअर करत म्हणाली,"मी 'त्याच्या' शोधात..."
Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब कॉफी पार्टनरच्या शोधात आहे. Read More
Riteish Deshmukh : मराठी सिनेमाच्या शूटिंगसाठी रितेश देशमुख पोहोचला Jamia Millia Isliamia मध्ये; कॉमन मॅन लूक व्हायरल
Riteish Deshmukh Movie : अभिनेता रितेश देशमुख सध्या दिल्लीतील सेंट्रल युनिव्हर्सिटी जामिया मिलिया इस्लामियामध्ये आगामी सिनेमाचं शूटिंग करत आहे. Read More
Kuljit Pal Passed Away : सिने-निर्माते कुलजीत पाल यांचे निधन; ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना सिनेमात दिलेला पहिला ब्रेक
Kuljit Pal : ज्येष्ठ सिने-निर्माते कुलजीत पाल यांचे निधन झाले आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Squid Game 2 : 'स्क्विड गेम 2'चा टीझर आऊट! 'या' दिवशी सुरू होणार मृत्यूचा खेळ


Squid Game 2 Teaser Out : 'स्क्विड गेम' (Squid Game 2) या बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. पहिला सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तेव्हापासून प्रेक्षक या दुसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत होते. या या बहुचर्चित कोरियन वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनचा टीझर रिलीज झाला आहे. 


Adipurush box office collection Day 2 : पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवसाच्या कमाईत घट; तरी दोन दिवसांत पार केला 150 कोटींचा टप्पा


Adipurush box office collection Day 2 : रामायणावर आधारित असलेला 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकीकडे या सिनेमावर मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तर दुसरीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 151 कोटींची कमाई केली आहे. 
'आदिपुरुष' हा सिनेमा 16 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 90 कोटींची जास्त कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 65 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने 151 कोटींची कमाई केली आहे. 


Adipurush : 'आदिपुरुष' सिनेमातले वादग्रस्त संवाद आठवडाभरात बदलणार, टीकेची झोड उठल्यावर निर्मात्यांना उपरती


Adipurush  Movie Latest Update : 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. हा सिनेमा रिलीज होण्याआधीपासूनच या सिनेमावर टीका होत आहे. सिनेमातील दृश्ये, संवाद, व्हीएफएक्स अशा अनेक गोष्टींवर टीका होत आहे. पण आता 'आदिपुरुष' सिनेमाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आठवड्याभरात या सिनेमातील वादग्रस्त संवाद बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. 'आदिपुरुष' सिनेमातले वादग्रस्त संवाद बदलण्यात येणार आहेत. काही दिवसांतच सिनेमाची सुधारित आवृत्ती सिने-रसिकांसमोर येणार आहे. आदिपुरुषचे संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ज्या संवादांमुळे जनतेच्या भावना दुखावत आहेत, ते संवाद बदलण्याचा निर्णय निर्माते आणि दिग्दर्शकाने घेतला आहे, असं मुंतशीर म्हणाले. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.