'तो काळ फारच भीषण होता...'; जेव्हा रुपाली भोसलेनं सांगितली होती तिची स्ट्रगल स्टोरी
एका मुलाखतीमध्ये रुपालीनं (Rupali Bhosle) तिच्या स्ट्रगल स्टोरीबाबत सांगितलं होतं.
Rupali Bhosle: छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमुळे अभिनेत्री रुपाली भोसलेला (Rupali Bhosle) विशेष लोकप्रियता मिळाली. रुपाली ही या मालिकेमध्ये संजना ही भूमिका साकारते. रुपालीनं बिग बॉस मराठी 2 मध्ये देखील सहभाग घेतला होता. रुपालीनं बालपणी खडतर प्रसंगांचा सामना केला होता. एका मुलाखतीमध्ये रुपालीनं तिच्या स्ट्रगल स्टोरीबाबत सांगितलं होतं. जाणून घेऊयात रुपालीच्या स्ट्रगल स्टोरीबाबत...
रुपालीनं एका मुलाखतीमध्ये तिच्या स्ट्रगल स्टोरीबाबत सांगितलं. ती म्हणाली, 'माझा जन्म वरळीमध्ये झाला. माझं बालपण हे मुंबईमध्येच गेलं. माझं शिक्षण फारसं झालं नाही. त्यामागे काही कारणं होती. नववीची परीक्षा मी नुकतीच दिली होती. त्यावेळी एक स्किम आली होती. माझ्या मोठ्या काकानं माझ्या आईला त्या स्किममध्ये पैसे भरायला सांगितले. तेव्हा आईनं काकाला सगळे सेव्ह केलेले पैसे दिले होते. ते पैसे त्या स्किममध्ये बुडाले. त्यामुळे आम्हाला आमचं शिक्षण बंद करावं लागलं. आम्हाला आमचं राहतं घर विकावं लागलं. त्यानंतर माझ्या बाबांच्या वहिनीकडे आम्ही राहायला गेलो होतो. भर पावसात तिनं आम्ही घराबाहेर काढलं. बाबांनी तिला घर विकल्यानंतर मिळालेले पैसे दिले होते. ते पैसे जेव्हा बाबा तिच्याकडे मागायला गेले तेव्हा तिनं ते पैसे दिले नाही.'
View this post on Instagram
पुढे रुपालीनं सांगितलं, 'आईला त्यावेळी दोनवेळा सिव्हिअर अटॅक आले. बाबांचा एक मित्र होता त्यांनी आम्हाला मदत केली. मी, माझा भाऊ आणि माझे आई-बाबा आम्ही अशा घरात राहिलो, जिथे आधी गुरं बांधली जायची. त्या घराच्या बाजूला एक रेल्वेचं रुळ होतं. माझा भाऊ तेव्हा मला म्हणाला की, आपण त्या रुळावर जाऊ झोपायचं का? म्हणजे हा सगळा त्रास संपेल. ते ऐकून मला आत्महत्येचे विचार मनात येत होते.'
'मला शिकायचं होतं, पण मला ते जमलं नाही. मी वयाच्या 15 व्या वर्षी कामाला सुरुवात केली. तो काळ फारच भीषण होता. पण मी ठरलं होतं की, मी जिवंत असेपर्यंत मी माझ्या कुटुंबाच्या आयुष्यात असे दिवस परत येऊ देणार नाही.' असंही रुपालीनं त्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या:
PHOTO: हेअरकट अन् पिवळं टीशर्ट, रुपाली भोसलेचा लूक पाहून तुम्हालाही आली का ‘अशी ही बनवाबनवी’ची आठवण?