Adipurush : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'आदिपुरुष'ची वाटचाल 300 कोटींच्या दिशेने; जाणून घ्या आतापर्यंतचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Adipurush Movie : 'आदिपुरुष' सिनेमाने रिलीजच्या नवव्या दिवशी 5.25 कोटींची कमाई केली आहे.
Adipurush Box Office Collection Day 9 : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजआधीपासूनच हा सिनेमावर टीका होत आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. पण बॉक्स ऑफिसवर मात्र या सिनेमाची यशस्वी दौघदौड सुरू आहे.
'आदिपुरुष' हा सिनेमा 16 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सिनेमा रिलीज झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. रिलीजच्या नऊ दिवसांत बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचाच बोलबाला पाहायला मिळाला आहे. रिलीजच्या नऊ दिवसांत या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.
View this post on Instagram
'आदिपुरुष'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Adipurush Box Office Collection)
'आदिपुरुष'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 86 कोटींची कमाई केली होती. पण नंतर सिनेमाच्या कमाईत घट व्हायला लागली. दुसऱ्या दिवशी 65.25 कोटी, तिसरा दिवस 29.03 कोटी, चौथा दिवस 16 कोटी, पाचवा दिवस 10.7 कोटी, सहावा दिवस 7.25 कोटी आणि सातव्या दिवशी 5.50 कोटींची कमाई केली आहे. आठव्या दिवशी 3.50 कोटी आणि नवव्या दिवशी 5.25 कोटींचा गल्ला जमवला आहे. एकंदरीत आतापर्यंत या सिनेमाने 268.55 कोटींची गल्ला जमवला आहे.
- पहिला दिवस : 86 कोटी
- दुसरा दिवस : 65.25 कोटी
- तिसरा दिवस : 29.03 कोटी
- चौथा दिवस : 16 कोटी
- पाचवा दिवस : 10.7 कोटी
- सहावा दिवस : 7.25 कोटी
- सातवा दिवस : 5.50 कोटी
- आठवा दिवस : 3.50 कोटी
- नववा दिवस : 5.25 कोटी
- एकूण कमाई : 268.55 कोटी
'आदिपुरुष'ची वाटचाल 300 कोटींच्या दिशेने
'आदिपुरुष' सिनेमाने रिलीजच्या नऊ दिवसांत 268.55 कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा सिनेमा 300 कोटींचा टप्पा पार करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 400 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती.
रामायणावर आधारित असलेल्या 'आदिपुरुष' या सिनेमात कृती सेनन (Kriti Sanon) आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमातील संवाद, व्हीएफएक्स अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना खटकल्या आहेत. वेगवेगळ्या कारणाने या सिनेमाला ट्रोल केलं जात आहे.
संबंधित बातम्या