Sara Ali Khan: 'हर हर महादेव',सारा अली खाननं घेतलं उज्जैनच्या महाकाल देवाचं दर्शन; पाहा व्हिडीओ
'जरा हटके जरा बचके (Zara Hatke Zara Bachke)' हा चित्रपट हिट ठरल्यानंतर सारानं उज्जैनच्या महाकाल देवाचं दर्शन घेतलं आहे.
Sara Ali Khan: अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. साराच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत. आता 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट हिट ठरल्यानंतर सारानं उज्जैनच्या महाकाल देवाचं दर्शन घेतलं आहे. नुकताच साराचा उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सारा ही महाकालेश्वर मंदिरामध्ये बसून प्रार्थना करताना दिसत आहे. सारानं सोशल मीडियावर महाकालेश्वर मंदिराचे काही फोटो शेअर केले आहेत. 'Peaceful In The Day' असं कॅप्शन सारानं या फोटोला दिलं आहे. महाकालेश्वर मंदिराबरोबरच उज्जैनच्या काल भैरव मंदिरामध्ये देखील सारा दर्शनाला गेली होती.
पाहा व्हिडीओ:
#WATCH | Actor Sara Ali Khan offered prayers at Shree Mahakaleshwar Temple in Madhya Pradesh's Ujjain, today pic.twitter.com/IwFhunIsTO
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) June 24, 2023
गेल्या महिन्यात देखील सारानं महाकाल देवाचे दर्शन घेतले होते. आता 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या यशानंतर पुन्हा सारानं महाकाल देवाचे दर्शन घेतले आहे.
सारा आणि विकी यांचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. विकी आणि सारासोबतच या चित्रपटात राकेश बेदी, शारीब हाश्मी, नीरज सूद या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
मंदिरात दर्शन घेतल्यानं साराला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
सारानं मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर सोशल मीडियावर काही जणांनी तिला ट्रोल केलं. याबाबत साराला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं. तेव्हा सारा म्हणाली, 'मी माझे काम खूप गांभीर्याने करते. मी लोकांसाठी काम करते. तुम्हाला माझे काम आवडत नसेल तर मला वाईट वाटेल पण माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय करायचं हे मी ठरवेल. ज्या भक्तिभावाने मी बंगला साहिब किंवा महाकालला जाईन त्याच भक्तीने मी अजमेर शरीफला जाणार आणि मी तिथे जात राहीन. लोकांना जे म्हणायचंय ते म्हणू देत, मला काही अडचण नाही. तुम्हाला एखाद्या ठिकाणी गेल्यावर जी ऊर्जा जाणवते, ती ऊर्जा तुम्हाला आवडली पाहिजे. माझा ऊर्जेवर विश्वास आहे.'
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: