![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Riteish Deshmukh : मराठी सिनेमाच्या शूटिंगसाठी रितेश देशमुख पोहोचला Jamia Millia Isliamia मध्ये; कॉमन मॅन लूक व्हायरल
Riteish Deshmukh Movie : अभिनेता रितेश देशमुख सध्या दिल्लीतील सेंट्रल युनिव्हर्सिटी जामिया मिलिया इस्लामियामध्ये आगामी सिनेमाचं शूटिंग करत आहे.
![Riteish Deshmukh : मराठी सिनेमाच्या शूटिंगसाठी रितेश देशमुख पोहोचला Jamia Millia Isliamia मध्ये; कॉमन मॅन लूक व्हायरल Riteish Deshmukh in delhi Jamia Millia Islamia university for marathi movie shooting Riteish Deshmukh : मराठी सिनेमाच्या शूटिंगसाठी रितेश देशमुख पोहोचला Jamia Millia Isliamia मध्ये; कॉमन मॅन लूक व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/25/0437ce5e29641e5b3f8c8a5b8096763c1687665208104254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Riteish Deshmukh In Jamia Millia Islamia : मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) नुकताच राजधानी दिल्लीतील सेंट्रल युनिव्हर्सिटी जामिया मिलिया इस्लामियामध्ये (Jamia Millia Islamia) स्पॉट झाला आहे. रितेश सध्या जामिया मिलिया इस्लामियामध्ये त्याच्या आगामी मराठी सिनेमाचं शूटिंग करत आहे. सेटवरील त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रितेश देशमुखच्या आगामी सिनेमातील त्याला लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार, रितेश काही पोलिसांसोबत जामिया मिलिया इस्लामियामधील अभियांत्रिकी विभागाच्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाबाहेर उभा असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच काही मुलीदेखील हाहात संहिता घेऊन उभ्या असलेल्या दिसत आहेत.
रितेश देशमुखचा कॉमन मॅन लूक!
रितेश देशमुखच्या आगामी सिनेमाचा लूक समोर आला आहे. या फोटोमध्ये रितेशचा कॉमन मॅन लूक पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य माणसांप्रमाणे त्याने साधं शर्ट आणि पॅन्ट परिधान केलीली दिसत आहे. तसेच त्याच्या खांद्यावर ऑफिस बॅगदेखील आहे. लीक झालेल्या व्हिडीओमध्ये रितेश देशमुखच्या बाजूला अनेक पोलीस उभे असल्याचे दिसत आहे.
रितेश देशमुख करतोय मराठी सिनेमाचं शूटिंग
रितेश देशमुख सध्या सिनेमाच्या शूटिंगसाठी जामिया मिलिया इस्मामियामध्ये आल्याचं सांगण्यात येत आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, रितेशच्या आगामी सिनेमाचं शूटिंग विद्यापीठातील विविध विभागात होत आहे. विद्यापाठातील वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंगसाठी खास सेटअप करण्यात आला आहे.
रितेशचा 'वेड' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. या सिनेमात तो पत्नी आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखसोबत झळकला होता. आता रितेशच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
View this post on Instagram
तुझे मेरी कसम या चित्रपटामधून रितेशनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.मस्ती, क्या कूल है हम, हे बेबी,धमाल,हाऊसफुल्ल,एक व्हिलन यांसारख्या चित्रपटात त्यानं प्रमुख भूमिका साकारली. तसेच त्याच्या माऊली, लय भारी या मराठी चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली.
संबंधित बातम्या
Riteish Deshmukh Genelia Deshmukh : "आता यापुढे आपलं काहीही होऊ शकत नाही"; विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रितेश-जिनिलीयाची खास पोस्ट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)