Best Marathi Movies : 'गोदावरी' ते 'व्हेंटिलेटर'; जाणून घ्या सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमांबद्दल...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 07 Jul 2023 02:44 PM
Telly Masala : गौतमी पाटीलच्या 'घुंगरू'ची रिलीज डेट ढककली पुढे ते 'बाईपण भारी देवा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Entertainment Live : मराठी मनोरंजनविश्वातील चटपटीत बातम्या जाणून घ्या... Read More
Best Marathi Movies : 'गोदावरी' ते 'व्हेंटिलेटर'; जाणून घ्या सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमांबद्दल...
Marathi Movies : गेल्या काही दिवसांत अनेक दर्जेदार मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. Read More
Baipan Bhaari Deva : बाई घरही चालवते अन् सिनेमाही... 'बाईपण भारी देवा'ने आठ दिवसांत पार केला 15 कोटींचा टप्पा; IMDB मध्ये बॉलिवूडलाही टाकलं मागे
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने रिलीजच्या आठ दिवसांत 15 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. Read More
Marathi Serial : 'ठरलं तर मग' की 'आई कुठे काय करते'? टीआरपीच्या शर्यतीत 'या' मालिकेने मारली बाजी
Tharla Tar Mag : टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. Read More
Happy Birthday Mahendra Singh Dhoni : रीलपेक्षी वेगळी आहे धोनीची रिअल लव्हस्टोरी; हॉटेलात भेट अन् डेटिंगला सुरुवात; जाणून घ्या महेंद्र सिंह धोनीची फिल्मी प्रेमकहाणी...
Mahendra Singh Dhoni : क्रिकेटच्या मैदानात चौकार आणि षटकार मारणाऱ्या महेंद्र सिंह धोनीचा आज वाढदिवस आहे. Read More
Tharla Tar Mag : ठरलं तर मग! सायलीच्या खोट्या प्रेमापोटी अर्जुनने हाती घेतला झाडू; म्हणाला,"बायको टेन्शन नॉट, तू माझी अर्धांगिनी "
Tharla Tar Mag : 'ठरलं तर मग' या मालिकेत आता अर्जुन सायलीची मदत करताना दिसणार आहे. Read More
Tarla Review : मनोरंजनाची मेजवानी देणारा 'तरला'; हुमा कुरैशीच्या अभिनयानं वाढली सिनेमाची गोडी
Tarla : हुमा कुरैशीचा (Huma Qureshi) 'तरला' हा सिनेमा नुकताच झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. Read More
Gautami Patil : महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचा परिणाम सबसे कातील गौतमी पाटीलवर; 'घुंगरू'ची रिलीज डेट ढकलली पुढे
Gautami Patil : गौतमी पाटीलची मुख्य भूमिका असलेला 'घुंगरू' या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bhumi Pednekar: 'ओठांची सर्जरी केली का?'; नेटकऱ्यांनी भूमी पेडणेकरला केलं ट्रोल


Bhumi Pednekar: अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.  भूमी ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. नुकतेच भूमीनं तिच्या खास लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. 


भूमीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे ओठ थोडे वेगळे वाटत आहेत, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. ब्लॅक आऊटफिटमधील फोटो भूमीनं सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं भूमीला ट्रोल केलं. त्या नेटकऱ्यानं कमेंट केली, तुला लिप फिलर्सची गरज नव्हती, तू अशीच सुंदर दिसते.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'तू ओठांची सर्जरी केली आहेस का?'


Hanuman : 'आदिपुरुष'नंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'हनुमान'


Hanuman : दाक्षिणात्य सुपरस्टार तेजा सज्जा (Teja Sajja) सध्या 'हनुमान' (Hanuman) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या टीझर, फर्स्ट लूक पोस्टर्सने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. घोषणा झाल्यापासून चाहते सिनेमाची प्रतीक्षा करत आहे. आता निर्मात्यांनी एक खास पोस्टर शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 


AI Voice Generator: AI ची कमाल! एक गाणं पाच गायकांच्या आवाजात, व्हिडीओ व्हायरल


AI Voice Generator:  AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर अनेक जण सध्या करत आहेत. गेल्या वर्षी, ओपन एआयने चॅट जीपीटी लाँच करून एआयच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. चॅट जीपीटी हा चॅटबॉट माणसांप्रमाणेच कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देतो आणि कमी वेळात अनेक कठीण कामे करू शकतो.  आता एक असे एआय टूल आले आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणाचाही आवाज निर्माण करू शकतात. याला व्हॉइस बॉट्स असं म्हटलं जातं. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की,  एआयचा वापर करुन एक गाणं पाच गायकांच्या आवाजात तयार करण्यात आलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.